shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचे कोरोनामुळे निधन..!!

पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचे आज (शुक्रवारी, दि. 23) कोरोनामुळे निधन झाले. लोहकरे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचा 30 सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू जाते.

उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. कोरोनाशी लढताना लोहकरे यांची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 504 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 494 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर तीन पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 7 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
close