shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चावडी व नाट्यगृहा समोरील नपच्या रस्त्यावरील बॅरिकेट संस्थानने त्वरित काढून टाकावे यासाठी शिर्डीत भाजपाच्यावतीने निवेदन व धरणे..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी)
 शिर्डी येथील न.पं. च्या मालकीचा व ताब्यात असलेला  चावडीमंदिर व नाट्यगृहा समोरील असणा्रया रस्त्यावरच श्री साईबाबा संस्थानने रस्ता बंद करण्यासाठी लावलेले  बॅरिकेट शिर्डी नगरपंचायतने त्वरित काढून टाकावे.अशी मागणी शिर्डीकर व  येथील दुकानदारांनी केली आहे.व तशा मागणीचे निवेदन नुकतेच शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनाही देण्यात आले आहे.

 या निवेदनात पुढे म्हटले आहे की,कोरोनामुळे या  काळात श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र  लॉकंडाउन काळात  येथील चावडी व नाट्यगृहा समोरील रस्ता व परिसर येण्या- जाण्यासाठी येथील दुकानदार व नागरिकांना खुला होता.  पण गेल्या 3/4 महीन्यापासुन एका परगावच्या विक्षिप्त महीलेच्या गैरवर्तनामुळे चावडी व नाट्यगृह समोर असणारा या नगरपालिकेच्या रस्त्यावर साई संस्थानने लोखंडी बॕरीकेट लावुन ,कुलुप लावुन तो पूर्णपणे बंद केला आहे.

या परिसरात गावचे मारुती मंदिर पण आहे. याठिकाणी अनेक ग्रामस्थ मारुती मंदिरासमोर उभे राहुन दर्शन घेत असायचे ते पण त्यामुळे बंद झाले आहे.
वास्तविक संस्थानने न.पं. चा कोणताही रस्ता बंद करणेपूर्वी न.पं. पदाधिकारी व मुख्याधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

तसेच न,पं. या परिसरातील रहीवाशी व व्यवसायिक यांचा विचार व संमती घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.
पण तसे काहीही न करता साईसंस्थान अधिकारी यांनी मनमानीपणे हे रस्ते बेकायदेशीर रित्या पूर्णपणे बंद केले आहेत.

शासनाने सर्व दुकाने, हॉटेल व्यवसाय सुरु करणेस परवानगी दिली आहे, त्याप्रमाणे शिर्डीतही अनेक दुकाने, हॉटेल सुरु आहेत. त्याप्रमाणे आम्हाला आमची यापरिसरातील दुकाने सुरु करायची आहेत. तसेच आम्हाला आमचे ग्रामदैवत मारुती मंदिराचे समोर उभे राहुन दर्शन घ्यावयाचे आहे.
त्यासाठी आजच न.पं. चे अधिकारी व कर्मचारी पाठवुन सदरचे बॕरिकेट्स काढुन टाकावे.  अशी मागणी करण्यात आली असून जोपर्यंत सदरचे बॕरिकेट्स काढत नाहीत.तोपर्यत आम्ही आपले कार्यालायातच बसुन धरणे धरु !अशी भूमिका घेतली आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले की, हे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात होत आहे. प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर या विषयावर व्यापक जन आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही संपूर्णपणे प्रशासनाची राहील.यावेळी शिर्डी नगरपंचायत मुख्याधिकारी डोईफोडे साहेब यांनी सांगितले की ,या संपूर्ण विषयाची माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ संस्थांननी किंवा पोलिस प्रशासनाने रस्ता बंद करण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही.

 शिवाजी गोंदकर यांनी साईबाबा संस्थानचे अधिकारी व पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांची समन्वयासाठी शिर्डी नगरपंचायत मध्ये बैठक बोलवावी आणि शिर्डीकरांच्या प्रलंबित प्रश्नावर बैठकीमध्ये शहरांमध्ये तोडगा काढावा असे सुचविले. सुजित गोंदकर यांनी व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान ,गावकऱ्यांची होणारी तारांबळ याबाबत विचार मांडले. नितीन कोते यांनी सांगितले की, नगराध्यक्ष अर्चनाताई कोते यांनी याविषयी वेळोवेळी प्रशासनास सूचना मांडल्या.परंतु काही उपयोग झाला नाही.

 या वेळी भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,उद्योग आघाडी संयोजक शिवाजीभाऊ गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाऊ पवार, राहता तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य किरण बोराडे,नितिन कोते,सुजित गोंदकर,युवा मोर्चा शहराध्यक्ष  योगेश गोंदकर,राम आहिरे,राजेश शर्मा,विनोद गंगवाल, विनोद संकलेचा ,जीवन ओस्तवाल, संजय संकलेचा,प्रमोद गोंदकर,राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, रमेश कोते, पारस जैन, सुनील भाऊसाहेब गोंदकर, सुधीर शिंदे, गणेश सोनवणे,दत्तू कोते, अमोल कोते, अंकुश राठोड, लखन बेलदार, प्रसाद शेलार, सोमराज कावळे.आदी  कार्यकर्ते व दुकानदार उपस्थित होते.
close