इंदापूर:१/११/२०२०. एस सी आरक्षण वर्गीकरण कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून इंदापूर येथे सर्व महापुरुषांना हार अर्पण करून वंदन करून एस सी आरक्षण वर्गीकरण लढा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वाक्षरीचे निवेदन देण्यात येणार आहे .
आज पश्चिम महाराष्ट्रातील मोहिमेला इंदापूर येथून शुभारंभ करण्यात आला या मोहिमे मध्ये आज मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यां संघटनेने या मध्ये भाग घेतला .पुढील काळामध्ये हा लढा यशस्वी करण्यासाठी विविध समाज संघटना व राजकीय पक्षांमध्ये काम करणारे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून इंदापूर येथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन स्वाक्षरी यशस्वी करण्याचा संकल्प केला .
पंजाब व हरियाणा राज्यात ज्याप्रमाणे राज्य शासनाने आरक्षण वर्गीकरण कायदा केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आरक्षण वर्गीकरणाचा कायदा करून आरक्षण वर्गीकरणाची शिफारस केंद्र शासनाकडे करावी आरक्षण लाभ वंचित समाज घटकांच्या माध्यमातून ही स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यात येणार असून ही स्वाक्षरी मोहीम आरक्षण वर्गीकरण लाखातील एक मैलाचा दगड ठरणार आहे असे मत रिपब्लिकन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे यांनी व्यक्त केले यावेळी प्रकाश बापू आरडे ज्येष्ठ मार्गदर्शक, संतोष भाऊ आरडे इंदापूर तालुका अध्यक्ष मातंग एकता आंदोलन, महादेव मिसाळ सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव धोत्रे भटके-विमुक्त नेते ,संतोष आरडे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते

