गुरूवारी रात्री तेराव्या आयपीएल सत्रात कोलकाता नाईड रायडर्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक रोमहर्षक सामना संपन्न झाला. आठ संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला एकमेकाशी दोनदा असे एकूण १४ सामने खेळावे लागतात. त्यापैकी १२ सामने प्रत्येक संघ या सामन्यापूर्वी खेळले होते. त्यातील सहा विजयांसह १२ गुण कमवून केकेआर प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न उराशी घेत या सामन्यात उतरले होते तर सीएसकेचे केवळ ३ विजयांसह केवळ सहा गुण असल्याने त्यांचे आव्हान संपले आहे. त्यामुळे या सामन्यातील जय पराजय त्यांच्या स्पर्धेतील अस्तित्वावर कुठलाच परिणाम करणार नव्हता. चेन्नई जिंकले तर त्यांचा पुढील स्पर्धेच्या हिशोबाने संघ बांधणीसाठी फायदेशीर ठरणार होते. तर केकेआरला केवळ विजयच हवा असल्याने त्यांच्यासाठी हा सामना अनन्यसाधारण महत्वाचा ठरणार होता.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरने विजयासाठी पुरेशा ठरतील इतक्या धावा धावफलकावर नोंदविल्या होत्या. शिवाय त्यांच्या गोलंदाजांनी सुरूवातीला पकडून मारा केल्याने चेन्नईवर दबाव कायम होता. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व अंबाती रायडूने डाव सांभाळून धावाही वाढविल्या परंतु मध्यंतरी अचूक टप्प्यावर बळी जात गेल्याने शेवटच्या दोन षटकात केकेआरने गोलंदाजीवर योख ते नियंत्रण न ठेवल्याने रविंद्र जडेजाच्या वादळी खेळीने सामना सीएसकेच्या खिशात गेला खरा पण केकेआरचे बाद फेरीचे गाठण्याचे स्वप्न इतर संघाच्या जर तरच्या कामगिरीवर अवलंबून राहीले आले. वास्तविक विचार करता केकेआरचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगल्यात जमा आहे.
प्रस्तुत लेखात चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचे सारथी ठरलेल्या खेळाडूंविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
सलग दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरीसह अर्धशतकी खेळी करत सलामीवीर ऋतूराज गायकवाडने सीएसकेचा डाव सांभाळला. त्याच्या ५३ चेंडूतील ७२ धावांची खेळीत सहा चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. ३७ चेंडूतच अर्धशतक ठोकणाऱ्या गायकवाडने अंबाती रायडूसह बहुमूल्य भागीदारी केली.
भरवशाचा अंबाती रायडू मोठी खेळी करू शकला नाही पण २० चेंडूत त्याने केलेल्या ३८ धावा शेवटी विजयात महत्वाच्या सिद्ध झाल्या. या डावात त्याने पाच चौकार व एक षटकार ठोकत गायकवाडसह ६८ धावांची बहुमूल्य भागीदारी केली. तीच अखेर महत्वपूर्ण सिद्ध झाली.
डावखुरा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा केवळ ११ चेंडू खेळला. परंतु या दरम्यान त्याने जो स्फोटक खेळ केला तोच या दोन संघातील विजय पराजयाचे अंतर ठरला. तीन षटकार व दोन चौकार मारताना जडेजाने शेवटच्या १२ चेंडूत ३० धावा हव्या असताना सामना केकेआरच्या घशातून ओढून काढला. शेवटच्या दोन चेंडूवर त्याने मारलेले दोन षटकार निर्णायक ठरले.
या सामन्या मोठया गॅपनंतर संधी मिळालेल्या वेगवान गोलंदाज लुंगी एंगीडीने सामन्यातील ८७ धावांची सर्वोच्य खेळी करणाऱ्या नितिश राणा व कर्णधार ओएन मॉर्गन यांना बाद करत आपल्या चार षटकांच्या हप्त्यात मात्र ३४ धावा खर्च केल्या.इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करणनेसामन्याच्या निर्णायक टप्प्यात केवळ नाबाद १३ धावा केल्या असल्या तरी उग्र रूप धारण केलेल्या रवींद्र जडेजाला छानपैकी साथ देताना ३८ धावांची भागीदारी केली.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

