पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर) :
पूर्व उच्च प्राथमिक (ग्रामीण) परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने एकूण १०५ शिष्यवृत्ती पैकी तब्बल ३० शिष्यवृत्ती राज्यस्तरावर मिळवून नवीन उच्चांक निर्माण केला. राज्यस्तरीय यादीत पुणे जिल्ह्यानेही ३० शिष्यवृत्ती पटकावून कोल्हापूर जिल्ह्याची बरोबरी केली आहे.
राज्यात दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्याने पटकावला आहे. पुणे जिल्ह्याचा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे.
राज्यस्तरीय यादीतील २९.१२% +२९.१२=५८.२४ शिष्यवृत्ती कोल्हापूर व पुणे जिल्ह्यानीच पटकावल्या आहेत.
तिसरा क्रमांकावर सांगली असून सांगलीने १२ राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पटकावल्या आहेत.तर साताऱ्याने राज्यस्तरीय १० शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत.काही जिल्ह्यांनी तर खातेही उघडलेले नाही.
पूर्व माध्यमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत एकूण ११० पैकी तब्बल ३४ राज्यस्तरीय शिष्यवृत्ती कोल्हापूर जिल्ह्याने खेचून आणल्या आहेत
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याने राज्यात पहिला, दुसरा, तिसरा,चौथा,पाचवा क्रमांकही पटकावला आहे. हे सर्व विद्यार्थी प बा पाटील हायस्कूल व ज्युनि कॉलेज मुदाळ ता. भुदरगडचे आहेत.
राज्याच्या गुणवत्तायादीतील एकूण ३०.९०% शिष्यवृत्ती कोल्हापूर जिल्ह्याने पटकावल्या आहेत.पुणे जिल्ह्याने द्वितीय स्तरावर राहून एकूण राज्यस्तरीय २४ शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत.
साताऱ्याने राज्यस्तरीय १० शिष्यवृत्ती प्राप्त केल्या आहेत.साताऱ्याने १०, रत्नागिरी ने १० व सांगलीने ०७ राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पटकावल्या आहेत.
पूर्व प्राथमिक ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यास्तरीय यादीत फक्त १३ जिल्ह्यांनीच यश मिळविले आहे.तर २२ जिल्ह्यांना तर खातेही उघडता आलेले नाही. ही बाब चिंतनीय आहे.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ३५ पैकी १० जिल्ह्यानीच राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत यश मिळविले असून २५ जिल्ह्यांना आपले खातेही उघडता आले नाही. ही बाब २५ जिल्ह्यांच्या माध्यमिक शाळांसाठी चिंतनीय आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी आपली शिष्यवृत्तीची परंपरा कायम टिकविली आहे.जादा तास,सुट्टी न घेणे,पदरमोड करून मुलांच्यासाठी १०० पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तयार करणे,झेरॉक्स काढणे ,परीक्षेला अन्यत्र घेऊन जाणे ,मुलांचा प्रवास खर्च करणे हे सर्व नित्याचेच होऊन बसले आहे.
शिक्षकांकडे समाजभान असले की चाकोरीबाहेर जाऊन शिक्षक काम करतात. आनंदी,अभ्यासू,तत्पर व तळमळीचे शिक्षक मुलांना भेटले तर मुले गगनाला भिडतात हे परत सिद्ध झाले आहे. शिक्षक हे आजीवन अध्ययन करणारे अभ्यासक असल्यामुळे यशाला गवसणी घालता येते.
शिक्षकांचे कठोर परिश्रम, मुलांची अभ्यासाची चिकाटी, पालकांचे सकारात्मक पाठबळ यामुळे हे यश प्राप्त होत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अमन मित्तल सर यांचे कृतिशील प्रोत्साहन ,शिक्षण अधिकारी प्राथमिक मा. आशा उबाळे ,शिक्षण अधिकारी मा. किरण लोहार ,शिष्यवृत्तीचे काम पाहणारे विस्तार अधिकारी डी सी पाटील, सर्व गटशिक्षण अधिकारी , संस्थांचे संस्थाचालक व सदस्य, विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याद्यापक व शिक्षक यांचेसमोर नतमस्तकच.
जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सर्व सन्माणित पदाधिकारी यांचे पाठबळ नेहमीच मिळत असल्याने यशात त्यांचाही वाटा आहे.सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तर उद्याचे भविष्य आहे.सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा व भरभरून शुभाशिर्वाद.
आपल्या सर्वाचा सखा,सोबती , सहकारी व हितचिंतक ( संपत गायकवाड.माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
( शहरी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती निकाल उपलब्ध न झाल्याने माहिती दिलेली नाही.)

