राहुरी फॅक्टरी - दि. १२ नोव्हेंबर
अर्चना बारकू गढधे रा. हंडाळवाडी, ता. पाथर्डी या साहसी मुलीने पाथर्डी (हंडाळवाडी) ते कळसुबाई आणि पुन्हा कळसुबाई ते (हंडाळवाडी) पाथर्डी असा ४५० कि. मी. चा सायकल प्रवास १०, ११ व १२ नोव्हेंबर २०२० या तीन दिवसात पूर्ण करून येक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अर्चनाला थांबवून तिचा शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी सत्कार करताना सौ. रुपाली थिटे, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, संचालक डॉ. विलास पाटील, नेहे साहेब, नीलिमा होले आदी हजर होते.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना साहसवीर अर्चना गढधे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्वात (१६४६ मी.) उंच असलेले कळसुबाई हे अकोले तालुक्यातील शिखर सर करण्याचे कारण म्हणजे व्यायामाने कोरोना मध्ये सुद्धा तुम्ही निरोगी राहू हकता तसेच बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी ही मोहीम हाती घेतली होती. तो संदेश माझ्या या मोहिमेची समाज्यात पोहचला असून राहुरी अर्बन निधी संस्थेने मला सन्मानित केले बद्दल मी त्यांची आभार व्यक्त करते.

