केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- लिंगायत समाज व वारकरी संप्रदायातील मानाची व अखंड परंपरा नूसार चालत आलेल्या राष्ट्रसंत सदगुरू शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची ६६ वी महापदयात्रा दिंडी केज शहरात गणेश मल्लिकार्जुन अप्पा डिगूळे यांच्या घरी शनिवारी सायंकाळी मुक्कामी आली व रविवारी सकाळी कपिलधार कडे मार्गस्थ झाली.
राष्ट्रसंत सदगुरू शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची ६६वी महापदयात्राची सुरूवात चापोली येथून होऊन कपिलधार महाराजांच्या पादुका घेऊन कपिलधार तिर्थक्षेत्रा कडे दरवर्षी जात असते. केज शहरातील गणेश डीकुळे हे महराजांचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या घरी किर्तन व फराळ व अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच साजरे केले जातात. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.
रविवारी सकाळी दिंडी मार्गस्थ होताना कपिलधार यात्रा विश्वस्त मंडळाचे मा. किर्तन केसरी भगवान बाबा पाटील, उद्धव महाराज हैबतपुरे, संजय उस्तुर्गे, मलेश कपाटे व डीकुळे परिवारासह भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

