shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी कारखान्याच्या ऊस तोड कामगार वसाहती येथे सर्व ऊसतोड कामगार यांना मिठाई फराळ वाटप...!!

साखर कारखाना म्हणजे सामाजिक उद्योग.. हर्षवर्धन पाटील. 

बिजवडी दि.१५ नोव्हेंबर २०२० कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना येथे (दि. १४) कारखाना स्थळी लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगार वसाहती येथे सर्व ऊसतोड कामगार यांना मिठाई फराळ वाटप व त्यांच्या बरोबर कामगार व सर्व सहकारी त्यांच्याबरोबर फराळ खाण्याचा दिवाळीचा आनंद लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ आणि ऊस तोड कामगार व पत्रकार उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित ऊसतोड कामगार यांना शुभेच्छापर भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले की ,हा उपक्रम म्हणजे सर्व ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी मी आणि सर्व सहकारी यांचा फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिवसभर कष्ट करून विश्रांतीच्या वेळी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे स्वागत आपल्याबरोबर कारखान्यातील कामगार यांनाही कामाच्या ठिकाणी फराळ पोचवण्याचा उपक्रम राबवला आहे.

कारखाना म्हणजे हा सामाजिक उद्योग आहे. यामध्ये अनेक व्यवसाय करणारे घटक असतात त्यांचे एकत्रीकरण कै शंकरराव पाटील (भाऊ )यांनी साखर कारखानदारी उभा करण्यामध्ये आयुष्य घालवले. त्यांच्यानंतर या कार्याची जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यावर आली .आम्ही सर्वांनी मिळून  कारखाना संदर्भातील काम करण्याचे सुरू केले आहे. कै
 गोपीनाथ मुंडे यांची आठवण पण झाल्याशिवाय राहत नाही .ऊस तोड वर्गासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर पंकजाताई मुंडे यांचा ऋणानुबंध टिकूनआहे. पुढे बोलताना पाटील म्हणाले की परवाच निर्णय झाला तोड वाढ संदर्भात त्रिपक्षीय करार फाईल घेऊन साखर संघाची अधिकारी आली होते त्यावरती माझी सही पाहिजे होती. आमच्या सह्या झालेल्या  आहेत जवळजवळ तुम्हाला १४ टक्के तोडणी वाढ ,कमिशन वाढ निर्णय झाला .दोन-तीन दिवसात परिपत्रक काढण्यात येणार आहे.परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील खाजगी कारखाना असो या सहकारी साखर कारखाना यामध्ये वाढ तुमच्यापर्यंत देण्याच्या संदर्भात केलेला आहे. सर्वसाधारण हिशोब केला असता ४७० कोटी रुपयाची वाढ  होणार असून यावर्षी तोड रक्कम  कष्टकर्‍या माणसाच्या पदरात पडणार आहे कोविड मुळे सर्व काही बंद पडले होते. आता अतिवृष्टीने कापूस पिके वाहून गेली काही राहिले नाही .जरी चेरमन असलो तरी आम्ही शेतकरी आहे .तुमच्या तिलच आम्ही आहोत .आम्ही काही वेगळे नाहीत. अशा अडचणीच्या काळात मदत व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी आल्यानंतर काही अडचणी सांगितल्या पाण्याच्या बाबतची अडचण सांगितली ती जरूर दूर केली जाईल. गाड्या च्या वाहतुकीच्या बाबतीत ट्रॅक्टर गाडी   इत्यादी सगळ्या अडचणी निश्चितपणे दूर करू. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला आनंद वाटतो की कर्मयोगी साखर कारखान्याचा आजचा १ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप झालेला आहे .अजून ५०% कारखान्याच्या मोळ्या टाकायचे राहिल्याआहेत.


 काहींनी मोळ्या टाकल्या परंतु चिमणीतून धूर निघाला नाही तोपर्यंत आपण दीड लाखाच्या पुढे गेलो .तेव्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे घडू शकलेले आहे आणि दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पहिला एडवांस पेमेंट  एफआरपी ची वाट न पाहता आता त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत आता इंदापूरच्या बाजारपेठेत गेलो असता खालच्या चौकातून चालत यावे लागले .मोटर सायकल वर येईना अशी अवस्था इंदापूरच्या बाजारपेठेची आहे .कारण सगळ्या घरापासून शेतकऱ्यांपासून तुमच्या पासून सगळ्यापासून या पैशाचा उपयोग झाला म्हणून आनंदाने दिवाळी साजरी होते आहे .सगळ्यांच्या आशीर्वादाने नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करा. कारखान्याच्या चिमणीतून येणारा धूर याचे अतूट नाते  आणि आपल्या चुली तून येणारा धूर दोन्ही एकत्र आले तर आपला संसार प्रपंच चालणार आहे ते काम आपण कारखान्याच्या माध्यमातून केले आहे १४ लाख टन गाळपाचे या वर्षाचे उद्दिष्ट आहे. या महिनाअखेर तीन लाखापर्यंत गाळप करायचे आहे .दर महिन्याला टारगेट ठरवलेले आहे. कसा प्रोग्राम करायचा ते ठरवले आहे.मागील आठवड्यात अडचण आली परंतु आता ते जुळून आलेले आहे .१४लाख टन गाळप १.५० कोटी लिटर डिसलरी तून प्रोडक्शन करायचे आहे यातून चांगल्या पद्धतीने शेतकरी आणि तुम्हाला नियोजन करत काम करायचं आहे या वेळी आम्ही ठरवले डिपॉझिट कमिशन वाट खर्ची ती लवकरात लवकर तो विषय यावर्षी संपवणार मागच्या सारखं राहणार नाही आम्ही प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले आहे ही विनंती .यावर्षी आला आहे पुढच्या वर्षी ही आलं पाहिजे .एक जना कडून ॲडव्हान्स घ्या .सगळ्या कडून घेऊ नका एवढे सहकार्य करा याठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र काढले आहे .कोविड सारखे उद्या दुर्दैव  काही प्रकार घडला तर आपण चार खोल्या आयसोलेशन साठी तयार करून ठेवले आहेत सुदैवाने प्रार्थना करतो तिथे कोणाला नेण्याची वेळ येऊ नये आपण सर्वांनी व्यवस्थित राहावे आरोग्य चांगले राहावे पाणी स्वच्छता इत्यादी दक्षता घेतली पाहिजे तुम्ही आमच्या कुटुंबातील आहे दोन पिढ्या पासून येत आहात .सगळे घटक समाधानी राहिला सगळ्यांनी व्यवस्थित काम केले सगळे आनंदी राहिले प्रत्येकाचा हिस्सा मिळाला तर अडचण येण्याचे कारण नाही सगळ्याच्या सहकार्याने काम करत असताना काही अपघात होता कामा नये याची दक्षता घ्यावी  .सर्व कामगारांचा विमा उतरवला आहे .उत्तम यशस्वी चांगल्या पद्धतीने गळीत हंगाम करू आमची जिद्द आणि तुमच्या सहकार्यातून पहिल्या दहा मध्ये कर्मयोगी कारखान्याचे नाव येईल असे काम करू तुम्हा सर्वांना व पत्रकार यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असे मनोगत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी याठिकाणी सर्वांनी फराळाचा आनंद घेतला तसेच महिलांनाही मिठाईचे फराळ कोपी च्या ठिकाणी जाऊन वाटप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले तर प्रस्तावना कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले
close