शिर्डी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे पाडव्यापासून दर्शनासाठी खुली होणार असून राज्यातील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. तशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी आज केली आहे .हा मोठा निर्णय नामदार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणामुळे गेल्या सात महिन्यांपासून सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती.
आरती पूजा संस्थांनमार्फत सुरू होती. मात्र भाविकांना दर्शनासाठी ही सर्व मंदिरे बंद होती व इतर धार्मिक स्थळे बंद होती. मात्र आज दीपावलीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. ही श्रींची इच्छा असे म्हणत त्यांनी मंदिरे खुले करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पाडव्यापासून शिर्डीच्या श्रीसाईबाबा मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी भाविकांना खुले होणार आहेत.
शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्यामुळे शिर्डीतील सर्व नागरिक, दुकानदार, साईभक्त यांनी आज फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मात्र मंदिरे खुली झाली तरी कोरोना संदर्भात अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. त्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे नुकतेच जाहीर होणार आहेत व ते देवस्थान व भाविकांनाही पाळणे गरजेचे राहणार आहे.
मात्र आज दीपावलीच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.शिरडी व परिसरात त्यांनी त्यांचे मोठे स्वागत होत आहे. मंदिरेखुलू होणार असले तरी त्या मंदिरातील संस्थान ट्रस्ट यांच्यावर मोठी जबाबदारी असून कोरोना संदर्भातील सर्व ती काळजी घ्यायची आहे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डी येते या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून दिवाळीला साई भक्त दर्शनाला नक्कीच आता शिर्डीत येतील असे दुकानदार हर प्रसादाचे दुकाने हॉटेल लॉज रेस्टॉरंट ट्रॅव्हल्स विविध दुकानदारांकडून बोलले जात आहे.
शिर्डीत कोरोनामुळे 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते मात्र ते आता दर्शनासाठी पाडव्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे येथील थांबलेली आर्थिक उलाढाल परत जोमाने सुरू होईल अशी आशा आता दुकानदार व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त ही शिर्डीकरांना व साईभक्तांना भेट दिली आहे असे नागरिक आता बोलत आहेत.

