shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मुरलीधर सोनवणे यांचे आज गुरुवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले.त्यामुळे पोलीस दलामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

शिर्डी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संजय मुरलीधर सोनवणे हे शिर्डी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. त्यांना सकाळी छातीमध्ये दुःखू लागल्यामुळे येथिल श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये त्यांना तात्काळ दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे घरातील, कुटुंबातील सदस्यही निरोप गेल्यानंतर येथे हजर झाले होते. मात्र त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला व त्यामध्ये त्यांचे निधन झाले. 

मृत्युसमयी त्यांचे वय58 वर्ष होते, त्यामुळे शिर्डी पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी ,कर्मचारी तसेच शिर्डीतील नागरिक व परिसरात त्यांच्या अचानक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे .संजय मुरलीधर सोनवणे हे शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अगदी प्रामाणिक व इमानदारीने काम करत होते. त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. ते मूळचे नाशिक येथील राहणारे असून त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. शिर्डी पोलीस स्टेशनला काम करत असताना त्यांनी कोणलाही  जाणीवपूर्वक त्रास दिला नाही. त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्याबरोबर शिर्डी व परिसरातील नागरिकांमधून ही हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पोलिसांना हृदयविकाराचा झटका येणे चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

पोलिसांना संख्याबळ कमी असल्यामुळे अतिरिक्त कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात आहे व या अतिरिक्त कामाचा बोजा मुळे मानसिक टेंशन पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात असते व त्यातूनच हृदयविकार यासारखे झटके येतात. असे पोलीस दलातून बोलले जात असून अकोले येथील किशोर पालवे या पोलिस कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे नुकतेच निधन झाले व त्यानंतर लगेचच शिर्डी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कामाचा बोजा हा  कमी प्रमाणात असावा.पोलिसांचे मानसिक संतुलन व त्यांनाही आपले घरदार आहे,पोलीस हा खाकी वर्दीतला माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी यांना वेळेवर सुट्ट्या तसेच पोलिसांचे कम तो मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी आता होत आहे.
close