सावळीविहीर (प्रतिनिधी) :
संपूर्ण भारतातील हिंदूचे आराध्य दैवत असणारे अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण कार्य वेगाने सुरू आहे.अशा श्री राम मंदिर निर्माण करण्यासाठी निधी संग्रह अभियान सुरू आहे. भारतात व महाराष्ट्रातही अभियान सुरू असून शिर्डी येथे श्री राम जन्मभूमि मंदिर निधी संग्रह अभियाना संदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली.
यावेळी ह.भ.प. नित्यानंद जी महाराज यांनी प्रत्येक हिंदू बांधवांनी या अभियानात सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलावा व आपला सहयोग श्रीराम मंदिराच्या उभारण्यासाठी असावा असे आवाहन केले.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण हेतू निधी संग्रह महाअभियानबाबत आज शिर्डी उपखंडाची बैठक पार पडली.या बैठकीत प्रमुख वक्ते श्री शिवाजीराव कचेश्वर उदावंत यांनी श्रीराम जन्मभूमीचा इतिहास व अनुभव कथन केले.तसेच प्रमुख पाहुणे श्री नित्यानंदजी महाराज यांनी अभियानात प्रत्येक हिंदू बांधवानी खारीचा वाटा उचलून अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी येथे मंदिराचे भव्य-दिव्य असे काम सुरू असून 2.7 एकर जागेमध्ये हे काम सुरू आहे .मंदिराचे मुख्य काम 57 हजार 400 वर्ग फुट असून मंदिराची लांबी 360 फूट तर रुंदी 235 फूट आहे 160 खांब असणारे तीन मजली भव्य असे हे मंदिर असून 161 फुटाचे शिखर आहे.
या भव्य दिव्य मंदिराचे निर्माण सध्या होत असून या मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलित करण्यात येत आहे व त्यासाठी निधी संग्रह अभियान देशभर सुरू असून शिर्डी येथे नुकतीच या अभियानांतर्गत बैठक संपन्न झाली.या बैठकीस शिर्डी, सावळीविहीर, डोऱ्हाळे, रुई, कनकुरी, निमगाव, नांदुर्खी येथील रामभक्त उपस्थित होते, बैठकीचा समारोप श्री योगेश कुमावत, विक्रांत पुरोहित यांनी केला.

