सोनई शहरातील बंद पडलेले सी, सी,टी,व्ही,कॅमेरे चालू करा सोनई प्रेस क्लबची मागणी
प्रतिनिधी,। मोहन शेगर :
सोनई : काही महिन्यांपूर्वी सोनई गावात महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तसेच चोऱ्या, व गुन्हेगारी यावर वचक राहण्यासाठी लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्ती कडून निधी उपलब्ध करून सी.सी.टी. व्ही.कॅमेरे बसवले होते.वाढत्या चोऱ्या लक्षात घेता बंद पडलेली सी.सी.टी. व्ही.कॅमेरे चालू करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. नुकतेच नवीन आलेले स.पो.नि.रामचंद्र कर्पे यांनी सी.सी.टी. व्ही.कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याचे सांगितले.
या ठिकाणी व्यापारी व नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते, तसेच वाहतूक सुद्धा मोठया प्रमाणात होत असते, गावातील प्रमुख रस्त्यावर पायी चालणाऱ्याची रहदारी मोठी आहे. काही वेळा वाहतुकीची कोंडी होती.दरम्यान अपघात होतात. सोनईला जोडणाऱ्या वाड्याची संख्या मोठी आहे, त्यामुळे व्यवहाराची मोठी उलाढाल होत असते. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. गावातून सुद्धा चोरटे गेल्याची माहिती मिळाली आहे, ते जर सी.सी.टी. व्ही.कॅमेरे चालू असते तर चोरटे पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी मदत मिळाली असती,नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सोनई गावातील बंद पडलेले कॅमेरे सुरू करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
दिवसा व रात्री कॅमेरेचे दिशा बदलणारे कोण?
गावातील बरेच सी.सी.टी. व्ही.कॅमेरे बंद आहेत.काही तुरळक चालू आहेत.त्या कॅमेरे ची दिशा रात्री बदलते हे कोण करते. कोण कोणाला अभय देत आहे,त्यामुळे अवैध वाळू धंदे व चोऱ्याकरणाऱ्याचे फावत आहे.स.पो.नि.कर्पे यांनी लक्ष घालून सी.सी.टी. व्ही.कॅमेरांचा प्रश्न सोडावा. --अशी मागणी सोनईच्या ग्रामस्थांनी केली आहे.

