shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका एकल शिक्षक सेवा मंच सहविचार सभा संपन्न...!!


इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: दि.१९ डिसें.२०.इंदापूर तालुका एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाची आॕनलाईन सहविचार सभा तालुकाध्यक्ष संजय म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष दादासो खेसे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


जिल्हा व राज्य स्तरावर एकल शिक्षक सेवा मंचाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबद्दल जिल्हाध्यक्ष दादासो खेसे यांनी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे जिल्हा सरचिटणीस संतोष तिखे , कार्याध्यक्षा मनिषा ननवरे व शरद मचाले यांनी विचार व्यक्त केले.

 
तालुक्यातील एकल सेवा मंचाचे सुनिल निकम , भारत ननवरे , अनिल शिंदे , संदिप पवार यांनी विचार व्यक्त केले.तालुकाध्यक्ष संजय म्हस्के यांनी तालुका कार्यकारीनीच्या कामाविषयी माहिती सांगितले व जिल्हा व राज्य स्तरावर तालुक्यातून सर्वोतपरी मदत करू असे आश्वासन दिले.महिला आघाडी प्रमुख सुप्रिया आगवणे यांनी महिला शिक्षकाच्या अडचणी व त्यासाठी संघटन लवकर मार्ग काढावा अशी विनंती केली,सभेसाठी तालुक्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी  यामध्ये बदली धोरण ,आंतर जिल्हा बदली, अवघड व सोप्या शाळा निश्चितीकरण, MS - CIT मुदतवाढ ,फंड प्रकरणे, मेडिकल बिल, वरिष्ठ वेतन त्रुटी, डी. सी. पी. एस. अनेक विषयावर चर्चा करण्यात आल्या.आॕनलाईन सभेचे नियोजन सुप्रिया आगवणे यांनी केले.संतोष हेगडे यांनी आभार मानले. अशी माहिती प्रसिद्धीप्रमुखभारत ननवरे  यांनी दिली.
close