राळेगणसिद्धी : अण्णांचे उपोषण 30 जानेवारी ला महात्मा गांधी हुतात्मा दिनाच्या दिवशी सुरू होणार होते.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली.त्यावेळी अण्णा हजारे यांनी शेेतकरी यांची बाजू भक्कम पणे मांडूून केंद्राच्या वतीने ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केेेले आहे.
या आहेत शिफारशी..
1) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा.
2) शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत दीडपट हमीभाव मिळावा.
3) दूध, भाजीपाला,फळे यांच्या किमान आधारभूत किमती निश्चीत कराव्यात.
4) केंद्रीय व राज्य कृषी मूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वयत्तता द्यावी.
5) दिल्ली च्या सीमेवर व देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे जन आंदोलन प्रचंड थंडीमध्ये सुरू असून शेतकऱ्यांना जाचक असणारे केंद्र सरकारचने 3 कायदे रद्द करण्यात यावे या मागण्या संदर्भात त्वरीत लक्ष घालून प्रश्न सोडवावा.
या शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी मा.अण्णा हजारे
३० जानेवारी 2021 महात्मा गांधी हुतात्मा दिन पासून
मौजे राळेगणसिद्धी ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे संत यादव बाबा मंदिरात उपोषण सत्याग्रह जनआंदोलन करणार होते.परंतु आज केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर समाधानी आहे,म्हणून उद्यापासूनचे उपोषण स्थगित करतो अशी अण्णा हजारे यांनी घोषणा केली आहे. अशी माहिती अशोक सब्बन, राज्य सरचिटणीस,मा.अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन यांनी दिली आहे.

