shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न : मोहमदीया संघ विजेता; कोळपेवाडीतील बजरंग तालीम संघ उपविजेता..!


प्रतिनिधी-विशाल लोंढे 
कोपरगाव - शहाजापूर येथील गौतम पब्लिक स्कूल येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट सामन्यात मोहमदीया क्रिकेट संघ विजेता ठरला असून, कोळपेवाडीतील जय बजरंग तालीम संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना 11 जानेवारी रोजी सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात आले.
4 जानेवारीपासून शहाजापूर येथील गौतम पब्लिक स्कूल च्या प्रांगणावर मोहमदीया मित्र मंडळाच्यावतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात जवळपास 80 संघांनी सहभाग नोंदविला होता. 11 जानेवारी पर्यंत सामने चालले असून, 11 जानेवारी रोजी सायंकाळी विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. मोहमदीया संघ सुरेगाव व जय बजरंग तालीम संघ कोळपेवाडी यांच्यात अंतिम सामना झाला. 

या सामन्यात बजरंग तालीम संघाने प्रथम फलंदाजी करीत 73 धावा काढल्या. सुरेगावच्या मोहमदीया संघाने चार चेंडू राखून 74 धावा काढत विजेतेपद मिळविले. मोहमदीया संघ हा 15 हजार  रुपयांचे बक्षीस व आमदार चषकाचा मानकरी ठरला. सदर बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मा.आमदार आशुतोषदादा काळे उपस्थित होते तर कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे,उपसरपंच बाळासाहेब ढोमसे,गौतम पब्लिक स्कूल चे प्रा. मा. नूर शेख, कोळपेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य राजू कोळपे व शहाजापूरचे ग्रामपंचायत सदस्य शोहेब पटेल आदींच्या हस्ते प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आले. तिस-या क्रमांकाचे बक्षीस शुटर बॉइज क्रिकेट संघ, चवथ्या क्रमांकाचे बक्षीस आयकॉन  संघ संगमनेर यांना देण्यात आले व तसेच उत्कृष्ट संघ म्हणून सुरेगावमधील मोरया क्रिकेट क्लब यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर सामन्यांचे आयोजन मोहमदीया क्रिकेट क्लब ने केले असून शोहेब पटेल व मुक्तार शेख यांचे अथक परिश्रम लाभले तर सामन्याचे सूत्रसंचालन शिवाजी मुके आणि दत्ता गोंडे यांनी केले.
close