shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हे खंडोबा राया ...कोरोना महामारी च्या संकटातून सर्वांना मुक्त करा ... आ.श्यामसुंदर शिंदे यांनी सपत्नीक घातले खंडोबारायाला साकडे..!!



 लोहा (प्रतिनिधी)-
 दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री. क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेवर यावर्षी कोरोना महामारी च्या संकटामुळे खंडोबारायाच्या यात्रेची शेकडो वर्षाची परंपरा  कोरोना च्या संकटामुळे शासनाने रद्द केली असल्याने यावर्षी यात्रा भरणार नसल्याचे शासनाने पत्रकान्वये कळविले होते.

यामुळे हजारो भाविक भक्तांची मोठी अडचण झाली आहे, काल सोमवारी श्री. क्षेत्र खंडोबारायाच्या देवस्थान पालखी सोहळ्यानिमित्त लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी श्रीक्षेत्र खंडोबारायाच्या पालखीचे दर्शन घेऊन कोरोना महामारीतून संबंध मानवजातीला कायम मुक्त करा म्हणून आ.श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे यांनी खंडोबारायाला साकडे घातले.

यावेळी श्री. क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या वतीने आ.श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आ.मोहन अण्णा हंबर्डे,आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मजा ताई रेड्डी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सभापती संजय बेळगे, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील,मृणाली राजूरकर, लोहा खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,संचालक सुधाकर सातपुते,पंकज आंडगेकर सह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते, यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिराची पाहणी करून आढावा घेतला..
close