सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर):
नविन घोडेगांव तालुका निर्मिती प्रकियेसाठी अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याची माहीती फुले-शाहू-आबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सुधीर वैरागर यांनी सांगीतले की, जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निदैशानुसार रूपेशकुमार सुराणा तहसीलदार नेवासा यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व खाते प्रमुखांणा घोडेगांव तालुक्यासाठी अवश्यक माहीती देण्याबाबत कळविले आहे.
घोडेगांव तालुक्यासाठी निर्माण करावयाची पदे,वेतन, भत्ते, वहाने व इतर खर्चाचा तपशिल अनुक्रमे- 1)जिल्ह्याधिकारी अहमदनगर (महसुल व नगरपालिका शाखा) 2) मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) 3)जिल्हा पोलीस अधीक्षक 4) जिल्हा न्यायालय 5)उपसंचालक वनविभाग 6)जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख 7)जिल्हा कोषागार अधिकारी 8)जिल्हा उपनिबंधक 9)जिल्हा मुद्रांक अधिकारी 10)जिल्हा उद्योग केंद्र 11)जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 12)कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे 13) जिल्हा अधिक्षक सां.बां.विभाग 14)जिल्हा अधीक्षक म.रा.वि.वि.विभाग 15)उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 16)विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ 17)भारतीय जिवन विमा निगम या विभागा कडुन तपशील मागितला आहे.
घोडेगांव तालुक्यासाठी प्रस्तावीत केलेल्या 12 हेक्टर 24आर क्षेत्रामध्ये शासकीय कार्यालये, निवासस्थाने व इतर बांधकामांसाठी अवश्यक असलेल्या खर्चाचा तपशील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागितला आहे.
घोडेगांव तालुक्यात समाविष्ट असलेले ऐकुण खातेदार, जमिन महसुल व गावनिहाय क्षेत्राचा तपशील कामगार तलाठी अनुक्रमे 1)घोडेगांव 2)झापवाडी 3)मोरगावहण 4)लोहारवाडी 5)शिंगवेतुकाई 6)राजेगाव 7)माडेगांव्हण 8)लोहगाव 9)मोरयाचिंचोरे 10)वाजोळी 11)पानसवाडी 12)धनगरवाडी 13)वंजारवाडी 14)बेल्हेकरवाडी 15)शिंगणापूर 16) चांदा 17)रस्तापुर 18)कौठा 19)म्हाळस पिंपळगाव 20)देडगांव 21)देवगाव 22)शहापूर 23) फत्तेपुर 24) माका 25) महालक्ष्मीहिवरे 26) तेलकुडगाव 27)पाचुंदा 28) सोनई 29)खेडलेपरमानंद 30)शिरेगाव 31)अमळनेर 32)निंभारी 33)करजगांव 34)पानेगांव 35)तामसवाडी 36) वाटापुर 37)गोमाळवाडी 38)गणेशवाडी 39)लांडेवाडी 40) वडाळा बहिरोबा 41)माळीचिंचोरा 42)हिंगोणी 43)कांगोणी 44)बऱ्हाणपुर 45)खरवंडी 46)नारायणवाडी 47) धनगरवाडी 48)निपाणी-निमगांव 49)रांजणगाव 50)नागापूर 51)कारेगाव 52) भानसहिवरे 53)खुनेगाव, यांच्याकडून मागितला असुन एकत्रित खर्चाचा अहवाल जिल्हाधिकारी अहमदनगर यांना तहसीलदार नेवासा सादर करणार आसल्याची माहीती सुधीर नाथा वैरागर यांनी दिली आहे.

