shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला सैनिक पोलीस प्रशिक्षण समारोप..!! मुलींनो आपल्या गावाचे नाव उज्वल करा-एम.एस.शेख..!!


मुलींनो आपल्या गावाचे नाव उज्वल करा-एम.एस.शेख..!!

अलिबाग। प्रतिनिधी(राजेश बाष्टे):
पेण-भारतीय सैन्यात महिला पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याची मानसिकता आपल्यात  निर्माण झाली आहे,त्या बद्दल तुमचे आणि सैनिक म्हणून देश सेवेला पाठविण्याची तयारी तुमच्या कुटुंबाने केली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो व भरतीस आमच्या भारतीय पत्रकार संघ तर्फे शुभेच्छा देतो असें एस. एम. शेख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

प्रशिक्षण शिबीर मध्ये मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष एस.एम.शेख, राष्ट्रीय सचिव जयपाल पाटील,प्राचार्य नरेश मोकल(फोटो-विकास रणपिसे)

रायगडचा युवक फोऊडेशन व परमानंद आश्रम ट्रस्ट च्या सहयोगाने सैन्यात महिला पोलीस भरती प्रशिक्षण परमानंद आश्रम दादर-पेंण येथे 7 दिवसाचे आयोजित करण्यात आले होते.
समारोप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर रायगड भूषण जयपाल पाटील,ट्रस्ट चे अध्यक्ष क्रृष्णकांत पाटील,माजी प्राचार्य नरेश मोकल,सचिव गोरखनाथ पाटील,       हे उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन आश्रमाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी जयपाल पाटील यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील 30 मुली प्राथमिक चाचणी घेण्यात आली त्या मधून भरती योग्य 9 मुलीची निवड होऊन ग्राउंड, लेखी परीक्षा,धावणे सरावास 7 दिवसाचे निवासी शिबिरात डॉ. अर्चना जोशी,पशुधन अधिकारी पंचायत समिती पेंण, कु.प्राजक्ता वाघ,डी फार्मा, राजेंद्र गुंजाळ, आर.सी.एफ.अधिकारी, पी.टी. शिक्षक नरेश मोकल,जेष्ठ पत्रकार, प्रदिप पाटील,108 रूग्ण वाहिकेचे डॉ. अजित बर्गे,दत्ताराम पाटील इत्यादिनी मार्गदर्शन केले असे सांगितले.

यावेळी मुलींना भरती साठी लागणारी सरपंच, पोलीस चॅरिञ्य दाखला,कोविड नाहीचा सरकारी दाखल्याची सर्व माहिती देण्यात आली. महाराष्ट्र मध्ये ही भरती 12 ते 14 जानेवारी ला हडपसर पुणे येथे होत आहे. यावेळी शिबिर अनुभव कु.पूजा पेडणेकर, कु.अनिशा घरत यांनी सांगितले.शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष उदय पाटील,खजिनदार जनार्दन पाटील,कार्य.सदस्य भाईदास पाटील, सुरेश पाटील.विकास रणपिसे,108 पायलट संजय पालवनकर,सीता पाटील,काशीपाटील,ह.भ.प.विश्वनाथ पाटील यांनी केले. 
close