shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा...!

पोलीस उतरले रस्त्यावर ..!

खर्डा प्रतिनिधी(अनिल धोत्रे): 
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक काळ हॉटस्पॉट राहिलेल्या जामखेडमध्ये दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेले दिसून येत आहे. त्यानुसार तालुक्यातील खर्डा याठिकाणी शनिवारी सायंकाळी मास्क न लावता भटकणाऱ्या अनेक नागरिकांना पोलीसाचा चाप देण्यास सुरुवात करताच अनेकांची भलतीच तारांबळ उडाली. समोर पोलीस पथक कारवाई करत असल्याचे पाहून अनेक जण धूम ठोकताना दिसून आले.

यावेळी सोळा विनामास्क नागरिकांवर कार्यवाही करत एक हजार सहाशे रुपयांची दंड वसूल करण्यात आले. 

मागील वर्षी लॉकडाऊनचे अनुभव ताजे असतानाही खर्डा मध्ये नागरिक बेशिस्त वावरताना दिसून येत आहे.खर्डा शहरात विनामास्क भिडणाऱ्याची संख्या जास्त आहे. मागील लॉकडाऊन बोध घेऊन आता शिस्तीचे दर्शन देणे गरजेचे आहे.

पोलिस प्रशासन यांच्या सूचनांचे पालन न केल्यास केव्हाही कोरोनाचा भडका उडू शकतो.

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्ग दर्शना खाली पोलीस संभाजी शेंडे, पोलीस कॉस्टेंबल शशी म्हस्के,विकास वांडरे यांनी दंडात्मक कारवाई दंड वसूल करण्यात आले.
close