shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मोरयाचिंचोरेत ५१ वृक्षांचे वृक्षारोपन... !


प्रतिनिधी । मोहन शेगार:
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जेष्ठ नागरिक मंच सदस्य,वाचनालय प्रतिनिधी,ग्रामस्थ यांचे हस्ते वृक्षारोपन संपन्न.

वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन शनिवार दि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचे  संकल्पनेतून साजरा झाला. प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदर्शगाव मोरयाचिंचोरेत ३६५ दिवस वृक्षारोपन करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिक मंच सोनईचे सदस्य, यशवंत प्रतिष्ठान चालवत असलेल्या वाचनालयांचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे ५१ विविध वृक्षांचे वृक्षारोपन करून वृक्ष व मराठी भाषा यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. 


यावेळी बोलतांना जेष्ठ नागरिक मंच सोनईचे सदस्य म्हणाले की आम्ही दरवर्षी मराठी भाषा दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करतो, परंतु यावर्षी प्रशांत गडाख  यांनी आदर्शगाव मोरयाचिंचोरे ता नेवासा येथे आमच्या हस्ते वृक्षारोपन करून वनराई व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यास पुढाकार घेतला आहे यातून आपल्या या माय मराठीचा गौरव होईल ही बाब निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी वड,पिंपळ,जांभूळ,कडू निंब,आदी देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले तसेच उपस्थितांनी यशवंत सार्वजनिक वाचनालयातील विविध पुस्तके वनराईच्या सानिध्यात वाचनाचा आनंद घेतला याप्रसंगी उपस्थित होते.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५१ वृक्षांचे वृक्षारोपन करतांना जेष्ठ नागरिक मंच सदस्य, वाचनालय प्रतिनिधी, मोरयाचिंचोरे ग्रामस्थ.


मराठी भाषा दिनानिमित्त आदर्शगाव मोरयाचिंचोरेत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५१ वृक्षांचे रोपन करत वृक्ष व भाषा हे आपल्या मातेसमान आहेत त्यांचे आपण जतन व संवर्धन केले पाहिजे हा संदेश वृक्षारोपनातून देण्यात आला.
close