shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा-नगराध्यक्षा अंकिता शहा..!!

इंदापूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा-नगराध्यक्षा अंकिता शहा..!!

नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे 

इंदापूर : प्रतिनिधी 

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा शहरामध्ये प्रसार होवू नये  यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व आढावा बैठकीचे आयोजन आज (दि. १) रोजी करण्यात आले होते.

या बैठकीस नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्णालय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, गटनेते कैलास कदम, नगरसेविका मीना मोमिन, नगरसेवक तथा इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, नगरसेवक प्रशांत सिताप, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, रमेश धोत्रे तसेच इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर सभा अधिक्षक गजानन पुंडे, पाणी पुरवठा पर्यवेक्षक सहदेव व्यवहारे व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी  नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा, आपले हात वारंवार साबणाने धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळावे, गर्दी करणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अश्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन  करावे असे आवाहन त्यांनी केले. 

नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी शहरामध्ये भरविण्यात आठवडे बाजार व मंडईतील भाजीपाला व फळ विक्रेते यांनी एकत्रीत गर्दी न करता त्यांनी सुरक्षित अंतर ठेऊनच भाजी पाला विक्री करावी. जे विक्रेते या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई  करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. ही कारवाई टाळण्याकरिता विक्रेत्यांनी, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव म्हणाले की, जे नागरिक मास्क न लावता घराचे बाहेर पडतील अश्या नागरिकांवर नगरपरिषद व इंदापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दि. १ मार्चपासून शहरातील ज्येष्ठ नागरिक व कोमाॅरबिड  रुग्ण यांना लस देणे सुरु केल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.
close