अपघातग्रस्तांना व्यवस्थित रुग्णालयात नेता यावे वेळेवर उपचार मिळवण्यासाठी " हायवे मृत्युंजय दुत " ही योजना राज्यात राबवली जाणार- महामार्ग पोलीस उपनिरीक्षक मुठेकर .!!
इंदापूर : महाराष्ट्रातील महामार्ग अपघातग्रस्तांसाठी डॉ. भूषण कुमार उपाध्याय (अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई) यांच्या संकल्पनेतून व संजय जाधव ( पोलीस अधीक्षक पुणे परिक्षेत्र पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर मुठेकर तसेच पोलीस अंमलदार केंद्र इंदापूर यांनी आज दि. १ मार्च रोजी हॉटेल स्वामीराज इंदापूर टोलनाका या ठिकाणी हायवे " मृत्युंजय दूत " अभियान हा कार्यक्रम आयोजित केला होता.

भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातामध्ये दिडलाख लोकांचा मृत्यु होतो. यात असे दिसून आले की , बर्याचदा अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना योग्य प्रथमिक उपचार मिळत नाहीत. योग्य वेळेत दवाखान्यात नेले जात नाही. किंवा दवाखान्यात नेते वेळी योग्य पध्दतीने रुग्ण हाताळला जात नाही. त्यामुळे अनखिन दुखापत होते. त्यातच प्राणहाणीचे प्रमाण वाढते. समाजात काही चांगले लोक ही आहेत.अपघात ग्रस्तांना मदत करतात.परंतु बरेच लोक पोलिसांचा किंवा कोर्टाचा ससेमिरा टाळण्यासाठी अपघातग्रस्तांना मनात असून देखील मदत करणायाचे टाळतात. त्यातच अनोळखी असल्यास तर मदतीला आणी उपचाराला खुप वेळ लागतो. त्यामुळे मृत्युच्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होते.
या करिता गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थित रुग्णालयात नेता यावे वेळेवर उपचार मिळवण्यासाठी " हायवे मृत्युंजय दुत " ही योजना राज्यात राबवली जाणार आहे.
महामार्गावरील माल, पेट्रोलपंप, लोकल ढाबे, हाॅटेलात काम करणारे कर्मचारी महामार्गावरील शेजारील गावातील चारपाच लोकांचा गृप तयार करुन त्या गृपला " मृत्युंजय देवदत्त " या नावाने ओळखले जाईल. या देवदुतांना अपघातातील प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या देवदुतांच्या प्रत्येक एका गृपला प्रथमोपचाराचे साहीत्य दिले जाणार आहे. त्यांना रुग्णवाहीका, सरकारी दवाखाना, पोलिसठाणे, यांचे संपर्क क्रमांक आणी पत्ते दिले जातील. महामार्गावर " हायवे मृत्युंजय दूत " यांना महामार्ग सुरक्षा पथकाकडुन ओळखपत्र देण्यात येणार आहे. आणी जे चांगले काम करेल त्यांचासाठी महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले GOOD SMARITTAN AWARD साठी शिफारस करावी. अशी योजना आहे. अशी माहिती या कार्यक्रमा वेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक मुठेकर यांनी दिली
वास्तविक आजपर्यंत अनेक अपघातात लोक वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू पावले आहेत. तसे न होता समाजामध्ये जागृती यावी मदतीची भावना निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत.
यावेळी कार्यक्रमास महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर मुठेकर, डॉ.श्रनिक शहा, डॉ. राजकुमार शहा, डॉ. संदेश शहा, इंदापूर नगरसेवक प्रशांत शिताप, समाजसेवक गफूरभाई सय्यद, चित्तरंजन पाटील, पॅथॉलॉजिस्ट महेश निंबाळकर व महामार्गावरील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक शेख यांनी केले.

