हिंगोली । प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील बसस्थानक मध्ये उतरणा-या प्रत्येक प्रवाशांची ग्रामिण रुग्णालयातील डाँक्टरांच्या पथकाव्दारे दि.०१ मार्च सोमवार रोजी कोविड-१९ अँन्टीजन तपासणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार सेनगांव ग्रामिण रुग्णालया अंतर्गत सेनगांव बसस्थानकात दि.०१ मार्च ते ७ मार्च पर्यंत बसस्थाकात उतरणा-या प्रत्येक प्रवाशांची कोविड-१९ अँन्टीजन तपासणी करण्यात येत आहे.रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.सचिन राठोड,तहसिलदार जिवकुमार कांबळे,न.पं.मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगांव बसस्थानकात तपासणी करण्यात येत आहे.या मोहीमेसाठी ग्रामिण रुग्णालयाचे डाँ.लोणकर,डाँ.मगर,अश्विनी सरपाटे,किरण सोनटक्के,स्वाती पारीसकर,अनिल नायकवाल,संदीप राठोड,बाळु आडे हे अथक परीश्रम घेत आहेत.

