shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रभक्तांना मानवंदना देणारी..."कविता"



राष्ट्रभक्त ही जमली जनता
देशभक्तीच्या रचिती कविता
राष्ट्रासाठी झीजले कणकण
त्यांची गाती जिवन गाथा...१

राष्ट्रभक्तीचे कवी संमेलन
मातृभूमीसी करण्या वंदन
राष्ट्रवाद हा विषय जयांचा
मनामनांतूनी रुजवायाचा...२

छत्रपतींचे आम्ही पाईक
राष्ट्रभक्तीची ध्वजा उभारू
मारू अथवा मारीत जिंकू
राष्ट्ररक्षिण्या जिवन अर्पू...३


जे जे पडले धारातिर्थी
त्यांची गाऊ रोज आरती
काव्यरसाने करूनी शिंपण
शूर विरांना करू या वंदन...४

रचनाकार: चंद्रकांत शहासने
देशभक्तकोशकार, पुणे
मोबाईल : ९८८१३७३५८५
close