shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना तपासणी न करून घेणाऱ्या केज शहरातील व्यापाऱ्या विरुद्ध प्रशासनाची कठोर कार्यवाही : केज शहरातील दुकाने केली सील...!!

 


नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाही
-- तहसीलदार, दुलाजी मेंडके..!!

प्रकाश मुंडे । केज :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आव्हान करूनही व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी न करणाऱ्या व्यापाऱ्या विरुद्ध प्रशासनाने कठोर कार्यवाहीचा बडगा उगारला असून तहसीलदार, नायब तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या पथकाने केज शहरातील नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांनाची दुकाने सील केली असल्याने खळबळ उडाली आहे.

" लोकांनी वेळोवेळी प्रशासनाने जारी केलेले कोरोना बाबतचे नियम।पाळावेत, मास्क, सॅनिटायझर आणि गर्दी टाळावी अन्यथा कार्यवाही अटळ .."
------ दुलाजी मेंडके, तहसीलदार, केज..!!

प्रशासनाने व्यासायिक किराणा दुकानदार यांच्या पासून कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे त्यांची कोरोना तपासनी केल्या शिवाय व्यवसाय सुरू न ठेवण्याचे प्रशासनाने आव्हाहन केले होते. परंतु केज शहरातील ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी करून घेतली नाही किंवा शासनाचे आदेश पाळले नाहीत. अशा व्यावसायिकांवर आज तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे, सचिन देशपांडे आणि प्रभारी मुख्याधिकारी सावंत यांच्या पथकाने कठोर कार्यवाही करून ते दुकाने सील केली आहेत. या प्रशांसाच्या कठोर कार्यवाहीमुळे खळबळ उडाली असून प्रशासनाचे आदेश पाळले गेले नाहीत; तर कार्यवाही करण्यास प्रशासन कचरत नसल्याचे दिसून येते.




close