shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुलेउमेदवारी अर्ज दाखल


पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपाकडून हिराबाई घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.भाजपाच्या हिराबाई घुले यांचा अर्ज भरताना महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, नगरसेवक हर्षल  ढोरे, सुरेश भोईर, सागर गवळी, चेतन घुले, नगरसेविका शर्मिला बाबर, स्विनल म्हेत्रे आदी उपस्थित होते.

तर राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण भालेकर, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.


 
उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज शुक्रवार (दि.१९) रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत होती. तर २३ मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे. केशव घोळवे यांना पाच महिन्याच्या आत उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला. घोळवे यांनी ५ मार्च रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले होते.
close