नेचर डिलाईट दूध प्रकल्पास राज्यमंत्री भरणे यांची भेट ; मंगळवारी लागली होती आग..!!
इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट दूध प्रकल्प, बाटली आणि पशुखाद्य कंपनीतील युनिटला आज मंगळवारी (दि.२३) रोजी दुपारी अचानक आग लागली.या आगीत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. आज गुरुवारी (दि.२५) रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी चिपळूनचे माजी आमदार सदानंद चव्हाण, ए.एच. देसाई, एस.एन.सिंग,सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप पवार,मयूर जामदार,दिपक देसाई,केशव हेगडे व इतर अधिकारी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यांनी या ठिकाणची परिस्थिती पाहून नेचर डिलाईट च्या प्रशासनाशी संवाद साधला.या आगीत संस्थेचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश भरणे यांनी दिले असून या संस्थेला नुकसानीचा विमा मिळवण्यासाठी शासन स्थरावर जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी मी सर्व ती मदत करणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

