श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा येथील डॉ. तायाजी लोंढे यांना डॉक्टरेट(Ph.D) पदवी प्रदान..!!
बावडा प्रतिनिधी:श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा.(ता.इंदापूर. जि. पुणे.) येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. तायाजी लोंढे सर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हिंदी की दलित कहानियोका समाजशास्त्रीय अध्ययन या विषयावर डॉक्टरेट(Ph.D) पदवी प्रदान करण्यात आली आहे.त्या बद्दल महाविद्यालयाच्या वतीने.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे सर यांच्या हस्ते अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्तात्रेय शिंदे, चंद्रकांत घोगरे ,दत्तात्रेय आरडे, सुवर्ण बागल इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.
तसेच श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील व संचालक मंडळ यांनीही लोंढे सर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

