shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथील श्री मांगीरबाबा व मालोबा-बालोबाची याञा रद्द..!!


देहरे (वार्ताहर): संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले व यात्रांची खरी सुरूवात नगर- मनमाड रोडवरील देहरे गावचे ग्रामदैवत " श्री मांगिरबाबा व मालोबा- बालोबा" या यात्रेपासूनच होते.असा महान इतिहास या यात्रेला आहे...!

देहरे(ता.नगर)येथील सालाबादप्रमाणे धूलिवंदनच्या दिवशी होणारी ग्रामदैवत श्री मांगीरबाबा व मालोबा-बालोबा यांची‌‌ यात्रा कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री युवराज आठरे साहेब व ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. 
  
  
सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी धार्मिक व इतर सर्व कार्यक्रमांना गर्दी करू नये.असे आदेश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर कालच्या बैठकीत गावची याञा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे बाहेरगावाहून येणार्या भाविकांनी याञेसाठी येऊ नये.व गर्दी करू नये तसेच आपल्या घरीच राहून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
    
यादिवशी केवळ पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी शासकीय नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.
  
यावेळी सरपंच बबन करंडे, उपसरपंच प्रा.दिपक जाधव, मार्केट कमिटीचे मा.संचालक संजय शिंदे सर, माजी चेअरमन उत्तम काळे, जिल्हापरिषदचे मा.सदस्य बाबासाहेब गायकवाड सर,तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे,मा.उपसरपंच भाऊसाहेब काळे,देहरे सैनिक अकॅडमीचे अध्यक्ष सुनिल बालवे,पोलिस पाटील चंद्रकांत खजिनदार सर्व ग्रामपंचायत सदस्य, व याञा कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.
close