shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात प्रेमविवाह केल्यानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ गुन्हा दाखल..!

पुणे:-परस्पर संमतीने प्रेम विवाह केल्यानंतर ही एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसोळी गावात हा प्रकार घडला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू सासरा आणि ननंदेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की 2018 मध्ये फिर्यादी महिलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच फिर्यादी महिलेचा पती आणि सासू सासरे यांनी हुंड्याच्या मागणीसाठी फिर्यादीचा छळ सुरू केला.

2018 ते 2020 या दोन वर्षांच्या कालावधीत फिर्यादी यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. त्यानंतर त्रास असह्य झाल्याने 2020 मध्ये त्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर आता त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
close