shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंत अभ्यासिकेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ व चर्चासत्र संपन्न

यशवंत अभ्यासिकेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ व चर्चासत्र संपन्न
इंदापूर प्रतिनिधी: (दि.५ मार्च२१) येथील भूमिपुत्रांचा यशवंत  अभ्यासिकेच्या वतीने अमरावती येथे प्रथमच पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या  ए.बी. जाधव तर एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  विजय बनसुडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तसेच संदिपान तोबरे ,पांडुरग कोळेकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबददल ह्या सत्कारमूर्तींचा नवले गुरुजी, प्रा. सोमनाथ माने सर, पवार सर यांच्या हस्ते  यथोचित सत्कार( दि.४) रोजी करण्यात आला.  गरिबीचे चटके सोसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ह्या  सत्कारमूर्तींनी आपापल्या परीने शिक्षण घेऊन आपल्या यशाला गवसणी घातली आहे. सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले की, यशाने हुरळून न जाता जबादारीने आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग समाज हितासाठीच करणार असल्याचे म्हटले आहे.
चर्चासत्रात राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सोमनाथ माने यांनी भाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सनी पवार, शंभु कचरे,, साजन चोरमले यांनी केले तर सूत्रसंचालन संजीवनी देशमुख आणि प्रनोती भारती यांनी केले. कार्यक्रम स्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली.
close