घोडेगांव तालुक्यासाठी स्मरणपत्र
पाठविले- सुधीर वैरागर
प्रतिनिधी । मोहन शेगर : घोडेगांव तालुक्यांसाठी आवश्यक असलेल्या माहीती करीता तहसीलदार नेवासा यांनी सर्व सबंधीत विभागांना स्मरणपत्र पाठविले असल्याची माहीती फुले-शाहू-आबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.
या संदर्भात आधिक माहीती देताना सुधीर नाथा वैरागर यांनी सांगीतले की.घोडेगांव तालुक्यांसाठी अवश्यक आसलेले गावनिहाय खातेदार जमिन महसुल व घोडेगांव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गावनिहाय क्षेत्राचा तपशील घोडेगांव, सोनई चांदा आणी वडाळा या चार मंडळातील (53)कामगार तलाठी यांनी तहसीलदार नेवासा यांचेकडे सादर केलेलाआहे परंतु आवर्ती आणी आनावर्ती खर्चाचा तपशिल प्राप्त झालेला नसुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्याने सबंधीत विभागानी आवर्ती आणी आनावर्ती खर्चाची माहीती तात्काळ दयावी या करीता तहसील कार्यालय नेवासा यांच्याकडून सबंधीत विभागांना स्मरन पत्र पाठविण्यात आलेले आहे.
घोडेगांव तालुका प्रस्तावसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असुन आवर्ती आणी अनावरती खर्चाची अंतिम माहीती सबंधीत विभाग प्रमुखांनी विनाविलंब तहसील कार्यालय नेवासा येथे पाठवावी असे नम्र आवाहन बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी केले आहे.
घोडेश्वरीचा तालुका
घोडेगांव या नावाला श्री.घोडेश्वरी देवीचा परीसस्पर्श लाभलेला असल्याने महाराष्ट्र राज्यांच्या नकाशात घोडेगांव तालुका झळकणार यात कोणतीही शंका किंवा अडचण नाही,
सुधीर नाथा वैरागर
बहुजन नेते
आनंद वाटला असता
घोडेगांव तालुक्यासाठी अनुक्रमे 1) सोनई 2) शिरेगाव 3) निंभारी 4) गोमाळवाडी 5) तामसवाडी 6) कारेगाव 7) रांजणगाव 8) नागापूर 9) खुनेगाव या ग्रामपंचायतीचे ठराव आले असते तर आनंद वाटला असता
सुधीर नाथा वैरागर
बहुजन नेते

