एरंडोल नगर पालिका ला आज २२ रोजी व्यापारी मंडळी ची बैठक झाली. सर्व सम्मती ने कोरोना रुग्ण संख्या जास्त वाढत असल्याने २४-३-२०२१ पासून २८ -०३-२०२१ पर्यंत कडकडीत पाच दिवस लॉक डाऊन करण्यात येणार आहे.
असे सर्व शासकीय प्रतिनिधी प्रांत अधिकारी विनय गोसावी, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, तहसीलदार अर्चना खेतमाळीस ,नगर अध्यक्ष रमेश परदेशी, उपाध्यक्ष अभिजित पाटील मुख्य अधिकारी किरण देशमुख, डॉ सुधिर काबरा व नगरसेवक तसेच सर्व व्यापारी बंधू सर्व पत्रकार व सर्व समाजातील प्रतीष्ठीत नागरिकांनी उपस्थित होते.
यावेळी हितेश जोगी, महेन्द्र पाटील यांनी काम पाहिले.
कोरोना बाधित रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर
एरंडोल नगरपालिका क्षेत्रात 24 ते 28 मार्चपर्यंत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी लागू केले निर्बंध 2021 रोजी 00.01 वाजेपासुन दिनांक 28 मार्च 2021 रोजी रात्री 24.00 वाजेपावेतोया कालावधीत जनता कफ ! – लॉकडाउन जाहीर करून खालीलप्रमाणे निबंध लागू करत आहे .
१ ) सर्व बाजारपेठा , आठवडे बाजार बंद राहतील .
२ ) किराणे दुकाने , Non- Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील .
अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी .
३ ) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील .
४ ) शैक्षणिक संस्था / शाळा / महाविद्यालय , खाजगी कार्यालय , सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील केवळ पुजारी दैनंदिन पुजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील . मान्यता प्राप्त विद्यापिठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे कागदपत्रे दाखवून तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल .
५ ) सर्व हॉटेल / रेस्टारंट ( अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलीव्हरी / पार्सल देणारे हॉटेल वगळता ) बंद राहतील ६ ) सभा / मेळावे / बैठका / धार्मिक स्थळे , सांस्कृतिक / धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील .
७ ) शॉपिंग मॉल / मार्केट , बार्बर शॉप , स्पा , सलुन , लिकर शॉप / दारू दुकाने , फेरीवाले , बंद राहतील .
८ ) गार्डन , पार्क , बगीचे , सिनेमागृहे , नाटयगृहे , व्यायामशाळा , जलतरण तलाव , प्रेषकगृहे , क्रिडास्पर्धा , प्रदर्शने , मेळावे , संमेलने बंद राहतील .
९ ) पानटपरी , हातगाडया , उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील .
१० ) दुधाची दुकाने , मेडीकल दुकाने , वृत्तपत्र सेवा , मिडीया सेवा , कुरिअर , पेट्रोलपंप ( अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) , रूग्णाला ने – आण करणारी रिक्षा सुरू राहतील . दुधाची दुकाने सकाळी 6 ते 9 आणि सध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील .
११ ) अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज , शासकीय कार्यालये ( ५० % उपस्थितीत ) , पूर्वीचे नियोजित परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील .
१२ ) आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक ( जसे एस.टी.महामंडळ , पोस्ट विभागाचे वाहने ) सुरू राहतील . रेल्वे , विमान , बस सेवा सुरू राहील .
१३ ) मेडीकल उपचार करणारे नागरिक / रुग्ण , त्यांची ने आण करणारे रिक्षा , मेडीकल दुकानातून औषधी घेणारे नागरिक , शासकीय कामावर असणारे कर्मचारी , रेशन घेण्यासाठी येणारे नागरिक , अपवादात्मक परिस्थीतीत प्रवास करणारे वाहन यांना पोलीस / न.प. पथकाला ओळखपत्र / उपचाराचे कागद व इतर कागदपत्रे दाखवावे लागतील .
१४ ) मेडीकल दुकाने , दुधाची दुकाने , रुग्ण वाहिका , रुग्णाला उपचारासाठी नेणारी रिक्षा , शासकीय कर्तव्यावर असणारी वाहने , आपत्ती व्यवस्थापन व तातडीच्या शासकीय सेवेवर असणारे अधिकारी कर्मचारी , शासकीय कामासाठी नेमलेले पथक व त्यांचे मदतनीस यांना या आदेशातून सुट देण्यात येत आहे .असे आदेश प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत.

