shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार कैलास पवार यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कारांनी सन्मानित..!!

पत्रकार  कैलास पवार यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कारांनी सन्मानित..!!
 सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल ; अनेक मान्यवरांकडून  शुभेच्छांचा  वर्षाव.

इंदापूर  प्रतिनीधी: 

इंदापूर तालुक्यातील  रेडा  ता. इंदापूर ,जि. पुणे येथील पत्रकार कैलास पवार यांच्या सामाजिक , पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन,  दैनिक तुफान क्रांतीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दैनिक तुफान क्रांती माणदेश नगरी सांगोला समूह च्या वतीने (दि. २१) मार्च रोजी दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर , नायब तहसीलदार साहेबराव मंडवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जिजामाता मल्टीपर्पज हॉल येथे दैनिक तुफान क्रांती तृतीय वर्धापनदिन सोहळ्यामध्ये  प्रदान करण्यात आला.
 
दैनिक तुफान क्रांती च्या तृतीया वर्धापन दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील आजूबाजूच्या चार ते पाच तालुक्यातील व मानदेश नगरीतील अनेक ज्येष्ठ पत्रकार, युवक पत्रकार, संपादक, चित्रपट, कला, शैक्षणिक, क्रीडा, नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. 
युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अमोलराजे इंगळे यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा
 दैनिक तरुण भारत, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक तुफान क्रांती अशा अनेक क्षेत्रांमध्ये  आपला ठसा उमटवणारे  पत्रकार  तुकाराम जाधव यांनी पत्रकार कैलास पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार कैलास पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता पत्रकार कैलास पवार म्हणाले की, इंदापूर तालुक्यात व पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काम करत असतानां आणि  पत्रकार क्षेत्रांमध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतानां जे आई-वडिलांनी माझ्यावरती संस्कार केले.  आई- वडिलांची सतत शिकवण असायची की,  आपल्या सुखापायी किंवा कोणतेही ही काम करताना दुसऱ्याला दुःख देऊन,  दुसऱ्याला फसवून, लांडीलबाडी करून किंवा आर्थिक नुकसान करुन आपला प्रपंच मोठा करायचा नाही .

कुठलं ही कार्य करत असतानां समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. सामाजिक किंवा कुठल्या क्षेत्रात काम करताना निस्वार्थी , निष्कलंक ,मनात कुठलीही हीन भावना न ठेवता काम  करायचं. हीच आई- वडिलांची शिकवण व हाच आदर्श  घेऊन काम करत असतो.

 पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना संपादक माऊली भगरे, दिगंबर भगरे, इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक विलासराव गाढवे ,संपादक धनंजय कळमकर ,जेष्ठ पत्रकार डॉ.संदेश  शहा, डाँ.  विकास शहा, राजेंद्र कवडे -देशमुख,  काकासाहेब मांढरे, संतोष दहिदुले , आबासाहेब उगलमुगले महाराज ,  ज्येष्ठ व युवक पत्रकारांचे सतत  मार्गदर्शन, सहकार्य  आशीर्वाद घेऊन काम करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो.
 
संत गुलाबबाबांचा आशीर्वाद व सांप्रदायिक क्षेत्रामध्ये संत गुलाबबाबा संस्थान गुलाबनगर (रेडा )ता.इंदापूर, जि.पुणे , संत गुलाबबाबा संस्थान काटेल (जि.बुलढाणा), संत गुलाबबाबा संस्थान टाकरखेड मोरे (जि.अमरावती) संत गुलाबबाबा संस्थान सागर (मध्य प्रदेश ) विश्वस्त ,अध्यक्ष, उपाध्यक्ष ,भक्तमंडळीचा सहवास,  वारकरी  संप्रदायातील कीर्तनकार, महाराज लोकांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, माझ्या गावातील माझे हितचिंतक, युवक मित्र यांची साथ यामुळे मला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना एक वेगळी ऊर्जा आणि उमेद मिळते.

 सामाजिक क्षेत्र असो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे आईवडिलांनी संस्कार दिले . विविध क्षेत्रांमध्ये लोकांची जनसंपर्क, सामाजिक असो कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, कुठल्याही क्षेत्रातील  समस्या आपल्या  लेखणीतून प्रश्न मांडण्यासाठी प्राधान्य, याच कार्याची दखल घेऊन आतापर्यंत राज्यस्तरीय , जिल्हा तालुकास्तरीय , जीवनगौरव, असे अनेक छोटे-मोठे  पुरस्कार मिळत गेले.

 येणाऱ्या १ एप्रिल २०२१ रोजी माझा जन्मदिवस, अभिष्टचिंतन सोहळा येत असून नवीन वर्षामध्ये सुरुवातीला हा " आदर्श सेवा सन्मान पुरस्कार " मिळाला त्यामुळे जोमान  काम करण्याची मला ताकद मिळणार आहे. माझ्या  छोट्याशा कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल दैनिक तुफान क्रांती चे संपादक , आमचे मार्गदर्शक मिर्झागालिब मुजावर व त्यांचे  उपसंपादक ,सर्व टीम सांगोला नगरीतील , माणदेश नगरीतील  सर्वांचा मी ऋणी आहे. मनापासून आभार व्यक्त करतो. अशी  प्रतिक्रिया  ह्यूमन राईट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष , इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया  मध्ये इंदापूर तालुका प्रतिनीधी  म्हणून काम करणारे पत्रकार कैलास पवार यांनी  दिली.
close