shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाचा महामारी मध्ये जनतेला कुठलीही मदत न करणाऱ्या मिस्टर इंडिया झालेले खासदाराने त्वरित राजीनामा दयावा:- बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष


श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
संपुर्ण देश आणि राज्यात तसेच नगर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना खासदारांनी पुढाकार घेऊन तीनही मंत्र्यांना सोबत घेऊन योग्य व मजबूत पाठपुरावा वेळेवर केले असते तर रुग्णांना घेऊन वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आलीच नसती.
            नगर उत्तर विभागाचे खासदार

शिर्डी लोकसभेचे खासदार जनतेला वाऱ्यावर सोडून मिस्टर इंडिया सिनेमा मधल्या हिरो सारखे जनतेतून गायब झाले आहेत व सिनेमा मधल्या हिरो सारखे ते ठराविक लोकांनाच मुखदर्शन देतात. 

सर्व सामान्य जनतेला आपले खासदार कोरोना महामारी च्या संकटात काहीही मदत का करत नाही ? असा प्रश्न पडलेला आहे. राज्यात त्यांची सत्ता असताना जिल्ह्यात त्यांचे सत्ताधारी पक्षाचे तीन तीन मंत्री असतांना देखील त्याचा फायदा जनतेसाठी खासदाराला करून देता आलेला नाही, व या  महाभयंकर संकटकाळी गोरगरीब जनतेला कुठलीही मदत न करता गायब झालेत.

नगर जिल्ह्याचे दक्षिणेतील सन्मा.खासदार हे पहिल्यादाच निवडून आलेत तरी देखील तीन ते चार दिवसापूर्वी रेमडेसीविर इंजेक्शनचा मजबुत साठा खाजगी विमानाने आणून  तरसणार्या रुग्णांना मदत केली, व जिल्ह्यातील इतर आमदारांनीही त्यांच्या त्यांच्या मतदार संघात मोठमोठे कोविड सेंटर उभारली तसेच इतर हॉस्पिटल ला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची देखील मदत करण्यात आली व अनेक रुग्णांचे नातेवाईकांच्या सुखादुखात सहभाग घेऊन  मोठ्या प्रमाणावर मदत करताना दिसत आहेत. 

तसेच श्रीरामपुर तालुक्यात प्रथमच निवडून आलेले आमदार,नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मदत करत असल्याचे दिसत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटे मध्ये निवडून आलेल्या खासदारांचे कुठलीही मदत शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेला आजपावेतो झालेली नाही.

या कोरोना आजाराच्या महामारी मध्ये अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ,बेड, व्हेंटिलेटर व रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नाही. यामुळे अनेक अगदी कमी वयातील रुग्णांचे मृत्यू होत आहेत.
हे घरातील इतर नातेवाईकांना डोळ्यांनी बघवत नाही.अनेकांचे संसार  पुरते उध्वस्त झाले. 

अशी महाभयंकर परिस्थिती नागरिकांना देखवत नाही असे असताना खासदारांना लोकांवर आलेले भयंकर संकटाची काहीही देणेघेणे नाही असेच वाटत आहे.अशा परिस्थितीत आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करणार नाही तर कधी मदत करतील असा प्रश्न जनतेला पडला आहे. 

जे खासदार निवडणूक च्या वेळी घरोघरी येऊन हाता पाया पडून मतांची भीक मागत होते. तेच खासदार आजच्या संकटाच्या काळात आमच्या मदतीला का येत नाही असे विचार नागरिकांच्या मनामध्ये येत आहे. 

या सर्वांचा विचार खासदारांनी लवकरात लवकर करून  कोरोना रुग्णांसाठी भव्य 1000 हजार,2000 हजार बेड चे कोव्हीड सेंटर उभारून त्यामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची मोठया प्रमाणात व्यवस्था करावी. त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या शिर्डी मतदार संघातील नागरिकांना त्वरीत दिलासा द्यावे.

जर खासदारा कडूनया कोरोना महामारी मध्ये नागरिकांना मदत करता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा दयावा. जेणेकरून जनतेला त्यांच्या हक्काचा व जनतेच्या सुखा दुखात सहभाग घेणारा खासदार निवडून आणता येईल.
असे श्री. बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मुलाखती दरम्यान आपले म्हणणे मांडले आहे.
close