shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुईछत्तीसी १४९ पैकी ५५ कोरोना बांधीत रुग्ण आढळले.



नगर-प्रतिनिधी (शिवा म्हस्के):

      नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे कोरोनाने थैमान घातले असुन दुसऱ्यांदा कोरोना अँटीजेन कॅम्प घेण्यात आला,गावातील परिस्थिती भयंकर स्वरुपाची बनली आहे,यांचाच विचार करुन माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी दुसऱ्या कॅम्पचे आयोजन केले,गावातील व शेजारील गावातील १४९ जणांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी ५५ पॉझिटिव्ह आले. असून काहींना अरणगाव,चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

तहसीलदार नगर यांनी आँनलाईन संरपच बैठीकत‌ गावतील शाळेत आयसोलेट करण्याच्या सुचना दिलेल्या आहे. गावातील‌ ज्यांचे वय कमी आहे त्यांना जनता विदयालयामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे,तसेच कोरोनाविषयी लोकांची मानसिकता बदलत चालली असून टेस्ट करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत चालले आहे,आजाराविषयी मनात भीती न बाळगता त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य वाढत असल्याचे जाणवत आहे,गावामध्ये कोरोनावर मात करुन बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या जवळपास ३० च्या घरात असून दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
विलगिरणात ठेवलेल्या रुग्णावर प्राथमिक उपचार करुन त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जाईल असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

  यावेळी माजी उपसभापती श्री.रविंद्र भापकर,सरपंच श्री.लोखंडे,सर्व ग्रामपपंचायत सदस्य.सामाजिक कार्यकर्ते कायम अग्रस्थानी कोरोनाच्या काळाय जनतेला आधार देण्यासाठी आणि कोरोनाच्या नियंत्रणासाठी  सरपंच विलास लोखंडे कायम अग्रस्थानी असल्याचे दिसून येते,यावरुन ते कर्तव्याशी एकनिष्ठ असल्याची प्रचिती येते.
close