shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लसीकरण करून सुरक्षित राहा' राज्यमंत्री भरणे यांनी कोवीड लसीचा डोस टोचून घेऊन केले आवाहन..!!


'लसीकरण करून सुरक्षित राहा'  राज्यमंत्री भरणे यांनी कोवीड लसीचा डोस टोचून घेऊन  केले आवाहन..!!


इंदापुर प्रतिनिधी:राज्यातील दररोज कोरोना रुग्ण संख्येला वाढत आहे त्याला आळा घालण्यासाठी सर्व स्तरातून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात येऊन कोवीड लसीचा डोस टोचून घेतला.

यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाॅ.सुहास शेळके,डाॅ.सुभाष बोंगाणे,स्वीय सहाय्यक अंबादास लांडगे.अनिकेत जाधव यांसह रूग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सध्या तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे.आरोग्य विभागाकडून चाचण्या ही वाढवण्यात आल्या आहेत.

या वेळी लसीकरण करून सुरक्षित राहण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले. मास्क वापरा,गर्दी करु नका,विनाकारण घराबाहेर पडू नका. सध्या उन्हाचा कडाका चालू असून वयोवृद्धांनी अशा स्थिती घराबाहेर पडू नये. कोणताही आरोग्याची समस्या जानवत असल्यास तात्काळ आरोग्य विभागातील डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले आहे.

close