shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ तनपुरे कारखान्याच्या उताऱ्यावरील गायब जमीन देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला द्यावी- आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - दि. ९ एप्रिल २१
नगर मनमाड महामार्गालगत डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठाण मालकीची ५६ गुंठे पोट खराबा क्षेत्र देवळाली प्रवरा येथील संभाव्य ग्रामीण रुग्णालयासाठी मिळावी अशी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी डॉ तनपुरे कारखाण्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांना आज दि. ९ एप्रिल२०२१  रोजी  दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे. 

आप्पासाहेब ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद असून , सभासद या नात्याने कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठाणची नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग लगत गायब झालेली कोट्यावधी रुपयांची ५६ गुंठे जमीन येथील संभाव्य देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयासाठी मिळावी म्हणून मी विनंती करीत आहे. 

मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील गट क्र. ८७७ चा सन   १९७६/७७ ते १९८६/८७ पर्यंतच्या ७/१२ उतारा व त्यावरील फेर क्र ३३३६ पाहता (१) साहेबराव अप्पा गवळी, (२) रंगनाथ अप्पा गवळी, (३) बाबुराव अप्पा गवळी, (४) अशोक अप्पा गवळी यांनी डॉ. तनपुरे कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानला २८ गुंठे पोट खराबा क्षेत्र खरेदी खताने खरेदी दिले आहे. 

तसेच फेर क्र. ३३३७ अन्वये (१) माधव नारायण गवळी, (२) बाळू नारायण गवळी यांनी डॉ. तनपुरे कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानला २८ गुंठे पोट खराबा क्षेत्र दुसऱ्या  खरेदी खताने खरेदी दिले आहे.

 वरील प्रमाणे गट क्र. ८७७ चा सन १९७६/७७ ते १९८६/८७ पर्यंतच्या ७/१२ उतारा व त्यावरील फेर क्र ३३३६ व ३३३७  पाहता डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानने २८ गुंठ्याच्या दोन वेगवेगळ्या खरेदी खताने ऐकून ५६ गुंठे पोट खराबा क्षेत्र खरेदी केलेले आहे. 

तथापी, नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कोट्यावधी रुपये किमतीचे सदर ५६ गुंठे पोट खराबा क्षेत्र लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानच्या गट क्र. ८७७/३ च्या ७/१२ उताऱ्यावरून आज रोजी गायब झालेले आहे.

देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील ३२ गावांसाठी देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक असून त्या दृष्टीने मंजुरीचे विविध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तथापी जागे अभावी सदर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित राहू नये म्हणून कृपया डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठाण मालकीची गायब झालेली ५६ गुंठे  पोट खराबा क्षेत्र संभाव्य देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयास देणेसाठी मंजुरी मिळावी व त्या कामी मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडे  सदर पोट खराबा क्षेत्र वर्ग करणे कामी उचित कार्यवाही करावी अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी निवेदनात शेवटी केली आहे.
close