shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टरांच्या कमिशन मूळे सिटीस्कॅनची संख्या व दरात वाढ..?



(कोरोना चा गोरख धंदा भाग -2 )

✍️ राजेश ईशी 

👉 कोरोना च्या गंभीर परिस्थितीशी सर्वसामान्य जनता मुकाबला करत असताना सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय सेवेच्या पांढरपेशा मुखवट्या खाली राजरोसपणे लुटमार करीत आपल्या पवित्र पेशाला बदनाम करणारे बहुतांश 'डॉक्टर रुपी राक्षस' यांच्या लुटीचा सुरस कथा उघड होत आहेत . त्यातीलच एक म्हणजे... सिटीस्कॅन ची तपासणी होय. 
केंद्र शासनाचे आरोग्य पथक नुकतेच पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनीही  डॉक्टरांकडून मोठ्याप्रमाणावर करण्यात येणाऱ्या सिटीस्कॅन तपासणी बाबत संताप व्यक्त करून , अशा डॉक्टरांना समज देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 


या पथकाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा करणारे धन्वंतरी यांनी देखील कोरोना साठी सिटीस्कॅन तपासणी ची  गरज अगदीच नगण्य असून केवळ अपवादात्मक स्थितीत रुग्णाला गरज असते . अन्यथा कोरोना सदृश्य लागण ची विविध लक्षणे ,  रुग्णाची पार्श्वभूमी , रक्त - स्व्याब तपासणी पुरेशी असल्याचे ठामपणे सांगितले.परंतु खाजगी असो वा सरकारी डॉक्टर , रुग्ण गेल्याबरोबर कोणतीही सविस्तर चौकशी , तपासणी वा निदान न करता थेट सिटीस्कॅन(HR CT) करण्यास सांगितले जाते. लहान मोठे गावात  सिटीस्कॅन ची सोय नसते किंवा एखादं दुसरेच असते. 

त्यामुळे तिथे रुग्णाची गर्दी होणे साहजिकच आहे. रक्त , लघवी , स्व्याब च्या तपासणी साठी रुग्णाला   5-10 मिनिटांचा वेळ लागतो . पण सिटीस्कॅन साठी मात्र एका रुग्णाला किमान अर्धा तास लागतो. या लागणाऱ्या जास्तीच्या कालावधी मुळे दिवसभरात कमी रुग्णांची तपासणी होते , त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार होते. आणी त्यातून नियोजनपूर्वक चर्चा पसरवली जाते की सिटीस्कॅन साठी 2/3 दिवसाची प्रतीक्षा यादी आहे , एव्हढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढले आहेत , परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यामुळे रुग्णाचे कुटुंबीय अधिकच धास्तवतात व नाईलाजाने वशिलेबाजी आणि  प्रसंगी ज्यादा पैसे मोजून आपल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी केविलवाणी धडपड करतात. मग त्याचाच गैरफायदा लुटारूची टोळी घेते आणि अवाच्या सव्वा फी आकारून लूट करतात. 

शहरात , परिसरात सिटीस्कॅन ची ज्यादा  सोय नसणे , रुग्णाची वाढती संख्या , एका रुग्णामध्ये *डॉक्टरांना द्यावे लागणारे 1000-1500 रू. पर्यंतचे कमिशन*  यामुळे एरव्ही 1500-1700 रू.त होणारी सिटीस्कॅन ची तपासणी साठी तब्बल 4000-5000 रू. लुटले जात आहेत. 

धुळे शहरात डॉ.माधुरी बोरसे बाफना यांच्या निरामय हॉस्पिटल मध्ये कोरोना साठीची सिटीस्कॅन(HRCT)  तपासणी केवळ 1500 रुपयात करण्यात येते , त्यांना ती परवडते मग इतरांना का परवडत नाही ? त्याच तपासणी साठी 4000-5000 रू . का लुटण्यात येत आहेत ? याचे कारण डॉक्टरांना द्यावे लागणारे मोठे कमिशन होय.

सर्वसामान्य , गोर गरीब , अडलेली नडलेकी जनता गंभीर संकटात असताना , जन सेवेचे नाटक करणारे , होर्डिंग्ज बाज, चमकोगिरी करणारे राजकीय पक्ष , नेते , कार्यकर्ते , संघटना गप्प का ? एव्हढी लुटमार खुलेआम सुरू असताना संबंधित शासकीय यंत्रणा , अधिकारी यांची निष्क्रियता , बघ्याची भूमिका देखील संशयास्पद असून त्यांनाही यातील वाटा मिळत असावा ,अशी चर्चा आहे....


✍️राजेश ईशी
मुक्त पत्रकार
दोंडाईचा, जि.धुळे
मो.न. 9421494438
close