shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

असहाय रुग्णांना लुटणाऱ्या हरामखोरांनो तुम्ही तरफडून मराल..: तेव्हा सोबत पैसा येणार नाही रे....?



( ✍️ राजेश ईशी  )
👉 करोना मूळे झालेल्या भयानक परिस्थितीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या जवळचे व रक्ताच्या नात्यातील नातेवाईक , सगे सोयरे , हितचिंतक एव्हढेच नव्हे तर काही ठिकाणी  आई  बापाच्या प्रेताजवळ मुलगा , मुलाच्या प्रेताजवळ बाप , भाऊ फडकत नाहीत आणि बेवारस सारखे अंत्यविधी सरकारी यंत्रणा मार्फत किंवा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकण्यात येत आहेत.

 

प्रेत पूर्ण जळाले की नाही? हे देखील कुणी पाहत नाही. अशी भयानक वस्तुस्थिती असताना काही सन्माननीय अपवाद वगळता  "उलट्या काळजाचे शैतान रुपी वैद्यकीय व्यावसायिक मात्र पैसे कमवण्याची संधी म्हणून याचा उपयोग करत आहेत".

सर्दी , ताप , खोकला सारखे वर्षानुवर्षे होणारा त्रास आता थेट करोनाशी जोडला जात आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किमतीची औषधी माथी मारणे , गरज नसतांना विविध तपासण्या करण्यास भाग पाडणे , आता सर्वांना सिटीस्कॅन करण्यास सांगणे , दुर्दैवाने लागण झाली तेव्हा  तर मात्र अशा हरामखोरी करणाऱ्यांना राक्षसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात कारण करोना रुग्ण एडमीट झाला म्हणजे या राक्षसांची लॉटरी लागते व सुरू होतो टप्याटप्याने रुग्णाला लुटण्याचा पांढरपेशा धंदा. रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहून पॅकेज ठरवले जाते अन् मनोमन किती लुटायचे याची आखणी केली जाते. डॉक्टर, नर्स , कंपाऊंड प्रत्येकजण एका वेळी एकच किट घालणार तरी देखील जेव्हढे रुग्ण दाखल असतील त्या सर्वांना एक एक किट चे  बिल लावणार , सलाईन - इंजेक्शन किती दिले याचा काही थांगपत्ता नसतो कारण रुग्णा जवळ कुणीही थांबलेला नसतो , गाजावाजा करून 800/900 रू. ला मिळणारे रेमडेसिविर इंजेक्शनचे थेट 5000-40000 पर्यंत लुटण्यात येतात. गरज नसताना रुग्णाला आपल्या रुग्णालयात जास्तीत जास्त दिवस दाखल करून लुटायचे मीटर जास्तीत जास्त सुरू ठेवले जाते. 
अनेक महाभागांनी एकमेकांच्या भागीदारीतून  रात्रीतून कोवीड सेंटर सुरू केले  तर काहींनी नियमित हॉस्पिटल बंद करून कोविड सेंटर थाटलेत . अशा महाभागांना खरोखरच रुग्णसेवा करायची होती का ? हा खरा सवाल आहे. 

 अशा प्रकारे संकटाचा पैसे लुटण्याची संधी म्हणून दुरुपयोग करणारे महाभाग दिवसाला लाखो , महिन्याला करोडो आणि वर्षाला शेकडो करोड रुपये कमावतील , त्या पैश्याचा बळावर मौज मजा देखील करतील पण ते स्वतः जेव्हा तरफडून मरतील तेव्हा हा पैसा त्यांच्या सोबत येणार आहे का ? याचा आंतर्मुख होऊन गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 

असा लुटीचा राक्षसी   वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या महाभागां नो रुग्णाला लूटण्याऐवजी किफायतशीर दरात त्यांना चांगली सेवा द्या , जनता तुम्हाला देवतेची उपमा देतात त्याला जागा , त्यांची दुवा/आशिर्वाद घ्या , ती दुवा / आशीर्वाद तुम्हाला - तुमच्या लेकरा बाळांना उपयोगी ठरेल. नाही तर तुम्ही रुग्णांना लुटून कमावलेले लाखो करोडो रू. तुमच्या लेकरा बाळांना वाम मार्गाला लावण्यास कारणीभूत देखील ठरू शकता...?, असे शेकडोंनी उदाहरणे समाजात आहेत, हे लक्षात घ्या. 'तेव्हा पैसे लुटण्याचा धुंदितून जागे व्हा आणि माणुसकी जोपासत रुग्णांची सेवा करा ', ही हात जोडून प्रार्थना आणि प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या धन्वंतरीना कोटी कोटी धन्यवाद .....!

राजेश ईशी
मुक्त पत्रकार दोंडाईचा धुळे
मी.न.९४२१४९४४३८
      🙏🙏🙏🙏🙏
  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
close