shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील साखरा येथील वृध्द महिलेचा खुन..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
हिंगोली जिल्हयातील सेनगांव तालुक्यातील साखरा येथील एमका ८० वर्षीय वृध्द महिलेचा खुन करुन साखरा तांडा येथील घाटाच्या बाजुला खड्डा करुन या महिलेला पुरुन टाकण्यात आल्याची घटना दि.१० एप्रिल रोजी उघडकीस आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


अधिक माहीती अशी की,साखरा येथील वयोवृद्ध महिला भारजाबाई मारोती इंगळे(वय ८० वर्ष) ह्या त्यांच्या चार मुलापासुन वेगळ्या राहात होत्या.दि.०८ एप्रिल  रोजी पहाटे १ ते ४ च्या सुमारास अज्ञात आरोपींनी सदर महिलेचा खुन करुन तिचा मृतदेह गावापासुन तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरा तांडा भागात एक खड्डा खोदुन पुरून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु शेतातील गोठ्यावरील नागरीकांना याचा चाळ लागला आणि कुत्रे देखील भुकंत होते आणि त्या पूरून टाकलेल्या खड्डयाच्या बाजुला काही दगडाला रक्त लागले होते त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी खुप नागरीक येत होते.याबाबत काही नागरीकांनी याप्रकरणी सेनगांव पोलीसांना माहीती दिली व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तो खड्डा खोदुन काढला असता त्यामध्ये साखरा येथील वयोवृद्ध महिलेचा मृत्युदेह आढळुन आला.

यामुळे या परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.यापुर्वी देखील साखरा येथे वयोवृद्ध महिलेचा खुन करण्यात करण्यात आला होता.आता साखरा येथील ही दुसरी घटना आहे.घटनास्थळी सेनगांव पोलीस सह हिंगोली ग्रामिणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.घटनास्थळी श्वानपथक देखील आले होते.याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.सदर महिला हि तिच्या चार मुलापासून वेगळी राहते चार ही मुले गावातच राहत असुन सदर महिलेचा खुन का?  करण्यात आला आणि या घटनेतील गुन्हेगार कोन? याबाबत चा तपास करण्याचे आव्हान आता पोलीसा समोर आहे.मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सेनगांव येथील ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
close