मुंबई:- शासनाने अनेक उपाय योजना व कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे.
यामुळेच आता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात कठोर निर्बंध लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून नव्याने लागू करण्यात येणाऱ्या कठोर निर्बंधांबाबत व दुर्बल घटकांसाठी दिलासादायक योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येत आहेत.आज रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवस राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे.
या कठोर निर्बंधांमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या.
हे राहणार बंद...!
- राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी लागू १४४ कलम लागू होणार..
- अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व आस्थापना बंद
- हॉटेल, रेस्टॉरंट बार बंद राहणार
- पुढचा १ महिना शिवभोजन मोफत
- ७ कोटी लोकांना तीन किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत
- नोंदणीकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये मदत
- परवानाधारक रिक्षावाल्यांना १५०० रुपये आर्थिक मदत देणार
- नोंदणीकृत घरगुती कारमगारांना निधी देणार
- ५ योजनांच्या ३५ लाख लाभार्थ्यांना अर्थिक मदत
हे राहणार सुरु
- अत्यावश्यक सेवेशी निगडित उद्योग सुरु
- खत दुकाने, शीत गृहे आणि शेती कामे सुरु राहणार
- किराना दुकाने सुरु राहणार
- वैद्यकीय सेवा सुरू राहणार
- औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे सुरु राहणार, कामगारांची वाहतूक व्यवस्था करा
- मेडिकल, रेल्वे, लोकल, बस सेवा सुरु
- सार्वजनिक वाहतूक सुरू
- पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरु
- सकाळी ७ ते रात्री आठ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार
- पार्सल सेवा सुरु
या साठी जनतेने सहकार्य करून कोरोनापासून आपला बचाव करावा.अशी विनंती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

