मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्याबाबतचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.
नवीन नियमावली जाहीर:-
किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११, दुध संकलन आणि वितरणाला परवानगी एअरपोर्ट आणि
बंदरावर काम करणाऱ्याना लोकलने प्रवास करण्याची परवानगी इतर राज्यातून येणाऱ्यांना ४८ तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे निर्णय घेणार दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११, भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११, कृषीसंबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११, पशुखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी ७ ते ११, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११, फळे विक्री- सकाळी ७ ते ११, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी ७ ते ११
या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा 48 तासांमधील निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. दूध संकलन आणि वाहतुकीवर निर्बंध नसतील. तसेच दुधाच्या रिटेल विक्रीला स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत सूट असेल, असेही नमूद करण्यात आलेय.
नवीन नियमावलीनुसार
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक असून महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक आहे. परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य धरला जाईल. मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचे प्रवेश असेल. बाजारपेठेत गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा. दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार आहे. एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रोमध्ये प्रवाशांची परवानगी असेल.

