shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे आणि पंचक्रोशीतील गावांसाठी साठी विशेष योग शिबीराचे आयोजन..!

देहरे । प्रतिनिधी : निरज जेठे
सध्या आपल्या गावातील कोरोनाचा प्रभाव पहाता पॉझिटिव्ह रुग्णांनी घाबरून न जाता आपण त्याला धैर्याने तोंड कसे दिले पाहिजे तसेच त्यासाठी काय केले पाहिजे. यासाठीच मुद्दामहून आपण आपले गाव आणि पंचक्रोशीतील सर्वांसाठी आपले योगशिक्षक प्रा. बाळासाहेब निमसे सर यांचे ऑनलाईन विशेष शिबीर google meet वर आयोजित केले आहे. तरी कृपया गावातील आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी शिबिरात सहभागी होऊन शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक:सरपंच सौ हिराबाई अजित करंडे, उपसरपंच,श्री दिपक नाना जाधव, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत देहरे यांनी केली आहे.


शिबिरांमध्ये योग चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, जलनेती, इत्यादी आपणास शिकवले जाईल. कालावधी- शुक्रवार दि. १४/०५/२०२१ रोजी
वेळ:- सायंकाळी ०७:३० ते ०८:३०
लिंक:-
https://meet.google.com/dcx-nyuf-jhf

शिबीर उपस्थितीमुळे नक्कीच आपण आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान टाळू शकता.
close