shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा कोरोनाग्रस्त महिलांसाठी असाही एक मदतीचा हात..!

HRCT टेस्ट होणार फक्त ५०० रुपयांत..!

प्रतिनिधी । आसावरी वायकर :-
लोणावळा (दि.१३): मावळ येथील कोरोनाग्रस्त महिलांना दिलासा देणारी बाब म्हणजे येथील कोरोना बाधित महिलांची HRCT टेस्ट केवळ 500 रुपयांमध्ये केली जाणार आहे. कुलस्वामिनी महिला मंच व मावळ राष्ट्रवादी महिला आघाडी यांच्या वतीने शासनाच्या नियमानुसार 2 हजार रुपये दर असणारी HRCT टेस्ट केवळ 500 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची लक्षणे लक्षात घेऊन HRCT तपासणी करून घेणे गरजेचे असते. इन्फेक्शनचा स्कोर किती आहे पाहून त्यानुसार उपचारांची पुढील दिशा या तपासणी वरुन ठरवता येते.
 
शासनाच्या नियमानुसार HRCT टेस्टसाठी 2 हजार रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र मावळातील महिलांना ही टेस्ट वेळेत व योग्य दरात करता यावी, म्हणून कुलस्वामिनी महिला मंच व मावळ राष्ट्रवादी महिला आघाडी यांनी पुढाकार घेऊन मावळातील महिलांना केवळ 500 रुपयांत ही टेस्ट उपलब्ध करून दिली असून प्रत्येक महिला रुग्णांचे उर्वरित दिड हजार रुपये कुलस्वामिनी महिला मंच व मावळ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने लॅबला देण्यात येणार आहेत. ही तपासणी करावयास जात असताना महिला रुग्णांचे आधार कार्ड व कोरोना रिपोर्ट सोबत असणे आवश्यक आहे.

मावळ तालुक्यातील पवना हॉस्पिटल, पायोनिअर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, साक्षी डायग्नोस्टिक्स, मायमर हॉस्पिटल, लोणावळा सिटी स्कॅन सेंटर या सहा ठिकाणी ही सवलत उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे आमदार सुनिल  शेळके यांनी सांगितले.
close