नगर । प्रतिनिधी :-
जगभरातील कोरोना महामारीच्या थैमानामुळे व योगय उपचाराअभावी सध्या महाराष्ट्रात मृत्युंचे तांडव चालू आहे.अशातच निरनिराळे उपचाराविषयी , काढ्याविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत.जे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देतात. असाच दावा एका डाॅक्टराने केला आहे.
कोरोना आजारावर देशी दारूचा काढा उपयुक्त असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला होता.आता हेच वक्तव्य आणि हा दावा डॉक्टरांसाठी अडचणीचा ठरला आहे. बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?:-
जाणून घ्या कोरोना रुग्णांना ३० एमएल
देशी दारू व त्याच प्रमाणात पाणी एकत्र करून दिल्यास
कोरोना आजार बरा होतो,असा दावा करणारा संदेश
बोधेगाव येथील डॉ.अरुण भिसे यांनी सोशल
मीडियावर टाकला होता.
त्यांचा हा दावा राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल
झाला. त्या संदेशात रुग्णांनादेशी दारू कोणत्या प्रमाणात द्यायला हवी तसेच बरे झालेल्या रुग्णांचा अभिप्राय, सोबत काही संशोधनाचे मुद्दे घालण्यात
आले होते. तो संदेश दिवसभरात प्रचंड प्रमाणात
सोशल मीडियावर फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान हेच प्रकरण आता डॉक्टरच्या चांगलेच अंगलट आलं आहे. शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना नोटीस काढून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे
आदेश दिले आहेत, तसेच तहसीलदार अर्चनापागिरे यांनी त्यांना संपर्क साधून बुधवारी (दि.१२)
तहसील कार्यालयात समक्षहजर राहून खुलासा देण्याचे
आदेश दिले आहेत.

