shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टीम "जाऊ द्या ना राव "टीमच्या कोविड दौऱ्याच्या पहिल्या प्रयोगाला भरपूर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव...!भाळवणी कोव्हीड सेंटर येथील यशस्वी कार्यक्रम..!!

नगर । विशेष प्रतिनिधी (रमेश जेठे):-
लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर , भाळवणी , पारनेर , अहमदनगर येथे 1100 बेड व्यवस्था असलेल्या कोविड सेंटरला शुभारंभाचा कार्यक्रम घेऊन ह्या टीमने त्यांच्या दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली.



"जाऊ द्या ना राव टीम "मधील अभिनेते सुमित सुभाष श्रीगोंदेकर यांचे आजोबा "स्व. पेंटर बाबुराव श्रीगोंदेकर" यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या 1100 बेडच्या कोव्हीड सेंटरला रुग्णांची सेवा कलेद्वारे सादर करून "जाऊ द्या ना रावच्या" कलाकारांनी तेथील कोरोना बाधित रुग्णांचे भरपूर प्रेम आणि आशिर्वाद मिळविले ...!

लोकनेते आमदार निलेशजी लंके  यांनी देखील टीमच्या कलाकारांना भरपूर शुभेच्छा दिल्या आणि सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मानित केले.

यावेळी अभिनेते सुमित सुभाष श्रीगोंदेकर "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह " च्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले की, "मला लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर , भाळवणी , पारनेर , अहमदनगर येथे 1100 बेड व्यवस्था असलेल्या कोविड सेंटरला "जाऊ द्या ना राव "च्या टिमला बोलावून "पहिला-वहिला प्रयोग करण्याची नामी संधी दिली. त्यामुळे संकटात सापडलेल्या रुग्णांचे मनोरंजन करून त्यांचा व  आमच्या टिमचा आनंद द्विगुणित झाला, आणि अनमोल सेवा करण्याची  मोठी सधी मिळावी. त्याबद्दल लंके साहेबांचे "जाऊ द्या ना राव " टीम तर्फे खुप खुप आभारी आहे. तसेच सर्व रुग्णांनी आमच्या टिमला भरभरून प्रेम व आशिर्वाद दिले. यामुळे मी माझ्या जीवनात कृतकृथार्थ झालो आहे. हा अनमोल ठेवा मी कधीच विसरू शकत नाही." सर्वांना धन्यवाद..!
असे व्यक्त करून अश्रूंना वाट करून दिली.
close