"शिर्डी एक्सप्रेस" च्या माध्यमातून नवं-कलाकारांसोबत चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक रमेश पवार यांची खास बातचीत.
माझ्या सर्व बंधु भगिनींना प्रणाम...
आज लॉकडाऊन मुळे बहुतेक जण मानसिकदृष्टया खचून गेला आहे म्हणून मला वाटतं आज आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी एकमेकांना सहकार्य करणे,समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलेही दिवस हे जातच असतात हे ही नक्कीच जातील... 🙏🙏🙏
जेव्हा आपण सिनेक्षेत्रात येण्याची स्वप्न पाहत असतो,
उदा:जर आपण अभिनय करत असाल तर आपलं स्वप्न असतं की एक दिवस मी मोठया पडद्यावर दिसलो पाहिजे, जर दिग्दर्शन करत असेल तर आपलं स्वप्न असतं की एक दिवस माझा चित्रपट रिलीज होऊन सर्व लोकांनी पाहिला पाहिजे, किंवा सर्व लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून किंवा साधारण माणूस म्हणून ही , अशी स्वप्न असणे उराशी बाळगणे ही चांगली गोष्ट आहे..
मी ही बाळगतो.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वांचेच अतोनात नुकसान तर झालंच आहे यात दुमत नाही पण त्याला घेऊन निराश बसण्यापेक्षा त्याच उमेदीने परत कामाला लागूया.
आपणही आत्ता परत आपल्या "बात्तकु"( एक वास्तविकता) ह्या चित्रपटासाठी Pre-Production चं काम नुकतंच पूर्ण केलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची शोधाशोध सुरू होतं, मग अश्यातच लॉकडाऊन चा काळ, परमिशन काढून आणि सर्व सुरक्षितता पाळून सुद्धा एखाद्या गावी मुंबईवरून आलेली कार दिसली की त्यातल्या माणसांना असं काही बघायचे जणु एखाद्या आतंकवाद्याला बघताहेत.
प्रत्येकजण आपल्या ठिकाणी योग्य आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोनाच्या भस्मासुराने भीती निर्माण केली आहे, त्या मुळे बाहेर गावी खास करून मुंबई, पुण्यावरून बाहेरच्या गावी गेल्यानंतर तेथील लोकांना पाहून, त्यांच्या मनातील भीतीची जागा संशयाने घेतल्यामुळे प्रत्येकाच्या संशयित नजरेकडे पाहून स्वतः लाच काहितरी अपराध केल्याचा भास होतो, हा माझा आत्ता झालेल्या लॉकडाऊन च्या अगोदाचा अनुभव आहे..
असो !!
मग अश्या वेळी आपल्या tecnology चा आधार घेत फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून सविस्तर सर्व माहिती लिहून जाहिरात टाकली..
बरेच फोटो, प्रोफाइल कॉल आले, येत आहेत..
आत्ता मी खास वेळ काढून बऱ्याच लोकांना कॉल करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं प्रोफाइल पाठवण्या मागचं किंवा चित्रपटात येण्यामागचं त्यांचं मत काय आहे.
खूप लोकांशी बोलल्यानंतर माझ्या हे ध्यानात आलं की हे त्यांचं "स्वप्न" आहे..स्वप्न पाहणे यात काही गैर नाही, पण केवळ स्वप्नचं पाहणे कदाचित हे बरोबर नाही असं माझं मत आहे, म्हणजे तुमचं शिक्षण आहे इंजिनिअरिंग तरी तुम्हाला हिरो व्हायचंय; का तर बॉडी आहे आणि गोरे आहात म्हणून, तुम्ही शिकलात भलतंच काही, पण त्यात न जाता तुम्ही स्वप्न पाहताय ज्या मध्ये तुम्ही कधी च काही ही शिकले नाही आहात आणि तरी तुम्हाला असं वाटतं की ते मी करू शकतो,
कारण परश्या किंवा आर्ची कुठले अभिनेता किंवा अभिनेत्री होते मग त्यांना जमलं तर मला का नाही जमनार..?
एका बाजूने बघितलं तर हे ही खरंच आहे, ते करू शकतात ते मी का नाही करू शकत?
चांगली गोष्ट आहे आत्मविश्वास असेल तर काहीच अश्यक्य नाही..
मग मला असं वाटतं की जर आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहचायचं असेल तर त्याचा मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे, पहिल्या पायरीपासून सुरवात करावी लागेल.
माणसाच्या अंगात कला जरी जन्मजात जरी असली तरी त्याला प्रशिक्षण घेऊनच पुनर्जीवित करता येऊ शकतं,
कारण सोनं खाणी त भेटल्यानंतर त्यावर सुद्धा बऱ्याच प्रक्रिया केल्या नंतर त्यावर ही चमक येत असते.
म्हणून आपण सुद्धा आपल्याला ह्या क्षेत्रात स्वतः च अस्तिव निर्माण करायच असेल, तर ज्या रस्त्याने आपल्याला जायचं असेल त्या रस्त्याची निदान माहिती घेतली पाहिजे, आत्ता आपण इंटरनेट च्या युगात आहोत ईच्छा असेल तर सर्व माहिती मिळू शकते तिथून ही शिकू शकतो,
किंवा कुणाचा असिस्टंट म्हणून कामं केली तरी भरपूर ज्ञान मिळू शकतं.
अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा इतर कोणीही बनण्यासाठी कशाचीही गरज लागत नाही, मला काही माहीत नसेल तरीही मी हे करू शकतो
केवळ हा समज घेऊन तुम्ही या क्षेत्रात येऊ पाहत आहात, किंवा स्वतःला तशी स्वप्न पाहण्यास परवानगी देत आहात हे असं करणं म्हणजे,
पोहणं एवढं काय अवघड आहे फक्त हात पाय तर हालवायचे आहेत, मग मारतो पाण्यात उडी! असं म्हणण्यासारखं होईल.
मित्रानो असं कराल तर
या मध्ये कदाचित जास्त रिस्क आहे जीव ही जाऊ शकतो हो ना!!!
म्हणून भावांनो, विचार करा, प्रयत्ना अंती परमेश्वर असतोच पण योग्य मार्गदर्शन घेऊन, योग्य मार्गाने प्रयत्न केला तरचं त्या प्रयत्ना अंती परमेश्वर असतो अन्यथा, आपल्या देहा चा अंत होतो पण प्रयत्नाचा अंत मिळत नाही.
असो.
मी आपल्यातीलच एक आहे आपल्याला उपदेश देण्याऐवढा थोर किंवा सल्ला देण्या एवढा विद्वान नाही याची कल्पना आहे, पन हे क्षेत्र हे "माझं घर"आहे आणि आपण सर्व कलाकार बंधू-भगिनी "माझा परिवार" म्हणून आपल्या घरातील थोरा मोठ्या समोर आपलं मत आपण हक्काने मांडत असतो..
लिहिण्यासारखं बरंच आहे तात्पुरती आपली रजा घेतो..
परत भेटतच राहू..
शक्य होईल तेवढं एकमेकांना सहाय्य करू, मग ते आर्थिक असो की मानसिक.सरकारी नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी सरकार त्यांच्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न हे करतच आहेत, पण या मध्ये कोरोणाचा प्रसार होण्यापासून केवळ जनताच अर्थात आपणच हे थांबवू शकतो..सर्वांनी आपली काळजी घ्या लॉक डाऊन उघडताच आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात होईल, चित्रपटाचे शूटिंग अहमदनगर, औरंगाबाद,नांदेड , मुंबई अश्या ठिकाणी असेल.
"शिर्डी एक्सप्रेस" चे मनःपूर्वक आभार
आपलाच बंधू
रमेश पवार
9930441312

