shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उप विभागीय पोलीस अधीकारी कोल्हापूर शहर यांना 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेकडुन निवेदन..!

कोल्हापूर । प्रतिनिधी: शाहूनगर(वड्डवाडी)राजारामपूरी कोल्हापूर येथील रोहीत चंद्रकांत साळोखे(22वय)या वडार समाजाच्या युवकाला एस.टी.गॕग. मध्ये काही संबंध नसताना दि.4 एप्रिल रोजी शाहू टोल नाका येथे झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यात अडकवले आहे.फिर्यादी सद्दाम अब्दुल सत्तार मुल्ला यांनी आंम्हास सांगितले आहे की,सदर घटनेशी रोहीतचा कसलाही संबंध नाही.या बाबत आंम्ही कोर्टात ही साक्ष देण्यासाठी तयार आहे.

रोहीतचा पुन्हा एखदा नव्याने पार्श्वभूमी पडताळुन रोहीत हा गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही याची खातर जमा करुन रोहीतला व त्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा.रोहीतला निर्दोष करुन मुक्त करावे.असे न झाल्यास मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून  कोल्हापूर व सांगली जिल्हा यांच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल.

अशा अशयाचे निवेदन मी वडार महाराष्ट्राचा या संघटने कडुन उप विभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग मंगेश चव्हाण यांना देण्यात आले आहे.यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाटेगावकर,कोल्हापूर शहर अध्यक्ष संजय शिंगाडे,पन्हाळा तालुका अध्यक्ष सुरेश वडर,सुरेश साळोखे यासह  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील मी वडार महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी उपस्थित होतीत.यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन योग्य ती खबरदारी घेतली होती.
close