आमच्या भागातील लहान बालचमुंच्या मनातले ओळखणारे .... मुकेश प्रतीष्ठान
सध्याच्या कोरोनाचा परिस्थितीमधे बरयाच ठिकाणी माझ्या पहाण्यात आले की, मोठ-मोठया घरांच्या बाहेर आंब्याच्या पेट्या, बॉक्स तसेच, सोसाइटीच्या पार्किंग मधे सुद्धा हेच चित्र दिसत होते, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने त्या-त्या कुटुंबाला, व कुटुंबातील मुलांसाठी आंबे खरेदी करुन आणतात व मुलांना तो आनंद देत असतात....!
आमच्या येथील झोपडपट्टी मधे चित्र थोड वेगळ आहे,
काही वेळेला आमच्या येथील लहान मुले मोठ्या काठ्या घेऊन बंगल्यांच्या बाहेर जाऊन आंबे, कैरी काढायचा प्रयत्न करतात, व पकडले गेले की मार मिळतो...!
या लहान मुलांच्या आई-वडिल दोघांनाही कोरोनाच्या काळात हाताला काम नाही मग, ते लहान मुलांना कधी हा आनंद देऊ शकतील, सध्याच्या परिस्थीतमधे त्यांच्या लहान मुलांसाठी ते आंबे घेऊन देऊ शकत नाहित,काही लहान मुलांना तर वडील आहेत तर आई नाही किंवा आई आहेत तर वडील कोरोनामुळे हयात नाहीत हे मुकेश प्रतीष्ठान ने हेरले, व भागातील लहान मुलांना तो आनंद द्यायचा उपक्रम हाती घेतला..!
म्हणुनच, हा आनंद यांच्या पासून कोणी हिरावुन घेऊ नये या साठी प्रयत्नशील राहिल, व
असे उपक्रम मुकेश प्रतीष्ठान दर वर्षी घेत राहिल, हेच मुकेश प्रतिष्ठान चे प्रामाणिक उद्दिष्ट असेल.
आंबे खाल्यानंतर त्या सर्व मुलांच्या चेहेरयावरच हास्य बरच काही सांगून गेले.आज माझ्या स्व.आईची जयंती.आई आज असती तर पाठीवर थाप नक्कीच मिळाली असती.
या उपक्रमाला माझे शाळेतील मित्र श्री. अमित सातव ( लंडन ) यांची मोलाची मदत मिळाली, तसेच नंदू दादा गायकवाड यांचा सुद्धा या उपक्रमासाठी हातभार लाभला.
आपला,
महेंद्र सुमन रामदास पवार
अध्यक्ष
मुकेश प्रतीष्ठान

